एक्स्प्लोर

Sanjay Raut: हिंमत असेल तर 105 आमदारांनी राजीनामे द्यावेत; शिवसेनेचे अमित शाह यांना प्रतिआव्हान

Sanjay Raut on Amit Shat statement : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपला प्रतिआव्हान दिले आहे.

Shivsena Leader Sanjay Raut  : महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे भाजपातील राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेतेदेखील वैफल्यग्रस्त झाले आहेत. हिंमत असेल तर भाजपने आपल्या 105 आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआव्हान शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. शिवसेनेने हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्यावी असे आव्हान दिले होते. त्यावर संजय राऊत यांनी आज प्रतिआव्हान दिले. 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. अमित शाह यांनी केलेले वक्तव्य असत्याला धरून असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या सरकारविषयी, शिवसेनेबद्दल, हिंदूत्वाबद्दल प्रश्न उपस्थित करून राज्यातील जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न राज्यातील भाजप नेत्यांकडून मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.  भाजपचे केंद्रीय नेतेदेखील वैफल्यातून त्यांचीच री ओढत असल्याचे राऊत यांनी म्हटले. सत्ता वाटपाबाबत शिवसेना खोटं बोलत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावरही राऊत यांनी टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत शाह याच्या उपस्थितीत 50-50 टक्के सत्ता वाटप ठरले होते. पुणे ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. या ठिकाणी त्यांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. त्यामुळे पुण्यात तरी शाह यांनी खोटं बोलू नये असे राऊत यांनी म्हटले. 

सत्तेसाठी हिंदूत्व सोडले असल्याचे शाह यांनी म्हटले होते. संजय राऊत यांनी त्याचाही समाचार घेतला. सत्तेसाठी 2014 साली शिवसेनेला दूर करा हे सांगणारे कोण होते हे अमित शाह यांनी सांगावे असे प्रतिआव्हान राऊत यांनी दिले. सत्तेसाठी शिवसेनेसोबत युती तोडणारे कोण होते, हे त्यांनी स्पष्ट करावे असेही राऊत यांनी म्हटले. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैसा, केंद्रीय सत्तेने तयार केलेली कृत्रिम लाटदेखील शिवसेनेला रोखू शकली नसल्याचे राऊत यांनी म्हटले. 

समोरून वार करा

भाजपने सीबीआय, ईडी आणि एनसीबी ही आपली तीन चिलखतं काढावीत आणि लढावे असे प्रतिआव्हान संजय राऊत यांनी दिले. आम्ही समोरून लढतो, छातीत वार करतो, पाठीत वार करणारे असेही संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे भाजपने आपली चिलखतं काढावीत मग वार करावेत असे आव्हान त्यांनी दिले. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Dharashiv: तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
तुटपुंज्या अग्रीम मदतीवरून तीव्र नाराजी; धाराशिवाच्या शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना केली 5 हजारांची मनी ऑर्डर; तर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, हा मदतीचा पहिला टप्पा...
Gold Silver Rate Today : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, चांदीही तब्बल 11000 रुपयांनी स्वस्त, आजचे ताजे दर किती? जाणून घ्या एकाच क्लिकवर
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded Accident News: पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
पहाटे चार वाजता टेम्पो दरीत कोसळला, तिघांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी; रेणुका मातेचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Maharashtra Live blog updates: मालेगाव शहरात आजपासून 10 मिनिटांची पाणी कपात
Salman Khan Share Photos With Salim Khan: 'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
'हम सब के बाप में है दम, वंदे मातरम्...', सलमान खानकडून सलीम खान यांच्यासोबतचे फोटो शेअर, कॅप्शननं जिंकली चाहत्यांची मनं, PHOTOs
Bhandara News : दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
दूष्काळात 'समाधाना'ची साठवण, भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरण शंभर टक्के भरलं, तीन जिल्ह्यांतील 2.59 लाख हेक्टर शेती सिंचनाची चिंता मिटली!
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Embed widget