एक्स्प्लोर

संजय राऊत शिवसेनेचे पोपट, रवी राणा यांचा टोला

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या आहेत त्या भाजपामुळे मिळाल्या आहेत. शिवसेना महायुतीमध्ये नसती स्वबळावर लढली असती शिवसेनेला 25 जागांवर समाधान मानावे लागले असते. शिवसेनेने जर त्यांची आडीबाजी सोडली नाही तर याच मोठं नुकसान शिवसेनेलाच होईल

मुंबई : संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट आहेत, त्यांनी फार बोलू नये असा टोला अपक्ष आमदार रवी राणा यांनी लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असा विश्वास त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केला. ओल्या दुष्काळासंदर्भात राणा दांपत्यांनी मुंबईत राज्यपालांची भेट घेतली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी विनंती त्यांनी या वेळी केली. रवी राणा म्हणाले, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील. शिवसेना ही आडकाठी करत आहे. युती मध्ये शिवसेना लढली म्हणून त्यांच्या तेवढ्या तरी जागा तरी आल्या आणि सेनेचेच 20 ते 25 आमदार माझ्या आणि मुख्यमंत्री यांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेने जर त्यांची आडीबाजी सोडली नाही तर याच मोठं नुकसान शिवसेनेलाच होईल. गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्र्यांनी जी काम केली ते पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच झाले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ज्या जागा मिळाल्या आहेत त्या भाजपामुळे मिळाल्या आहेत. शिवसेना महायुतीमध्ये नसती स्वबळावर लढली असती शिवसेनेला 25 जागांवर समाधान मानावे लागले असते. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात जी चर्चा झाली त्यातून युतीची घोषणा करण्यात आली आहे. तसंच रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास व्यक्त करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.  Navneet Rana | सेनेचे 20-25 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, अपक्ष आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा | ABP Majha मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर थोड्याच दिवसात शिवसेनेचे आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा त्यांनी या वेळी केला. शिवसेनेची सध्या मुजोरी चालली आहे, ती थांबवली पाहिजे. शिवसेनेकडून निकालानंतर अशा प्रकारची विधान म्हणजे हा राज्यातील जनतेचा अपमान आहे. जनता शिवसेनेला जनता योग्य वेळी धडा शिकवेल.

महत्त्वाच्या बातम्या

जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Embed widget