एक्स्प्लोर

Corona Lockdown | व्हायरल व्हिडीओची संजय राऊतांकडून दखल, मेंढपाळांची केली जेवणाची सोय

गरीब धनगरांचा आवाज पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोचला की नाही माहीत नाही. पण हा व्हिडिओ पाहून मुंबईतील दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांच्यापर्यंत पोहचला. टिळेकर यांनी मेंढपाळांना मदत करण्यासाठी पाऊल उचलले.

बुलढाणा : लॉकडाऊनमुळे बुलढाणा शेजारी असणाऱ्या एका गावाच्या माळावर 20 मेंढपाळ अडकल्याचा आणि त्यांना मदत हवी असल्याचा एक व्हिडिओ फेसबुकवर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र प्रत्यक्षात त्या मेंढपाळपर्यंत कोणतीच मदत पोहचली नव्हती. हा व्हिडीओ पाहून मुंबईतील दिग्दर्शक निर्माता महेश टिळेकर यांनी खासदार संजय राऊत यांच्या सहकाऱ्यांनी या मेंढपाळांपर्यंत मदत पोहोचवली आणि मेंढपाळांचा सोबत असणाऱ्या मुक्या जनावरांना जीवदान दिलं.

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर लक्ष्मण खेडकर यांनी एक पोस्ट आणि व्हिडिओ टाकला होता. यामध्ये लॉकडाऊन मुळे बुलढाणामध्ये उमरे नावाच्या एका गावाजवळ माळरानात काही धनगर अडचणीत होते. जवळपास खाण्याचे काहीच नाही, बरोबर बकरी, गायी, बैल, कुत्री असा लवाजमा उपाशी. जनावरांना खायला चारा नाही तर जगणार कशी. चिंतेत आणि संकटात असणाऱ्या त्या धनगराने त्याला आणि त्याच्या कबिल्यामधील वीस लोकांना मदत मिळावी म्हणून पंतप्रधान मोदींना मदतीसाठी एका व्हिडीओच्या माध्यमातून विनंती केली होती.

गरीब धनगरांचा आवाज पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोचला की नाही माहीत नाही. पण हा व्हिडिओ पाहून मुंबईतील दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांच्यापर्यंत पोहचला. टिळेकर यांनी मेंढपाळांना मदत करण्यासाठी पाऊल उचलले. त्यांनी बुलढाणाचे आमदार यांचा फोन नंबर मिळवून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे सगळेच नंबर स्वीच ऑफ येत होते. आणखी एक प्रयत्न म्हणून त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली . लवकरात लवकर त्या धनगरांना मदत करावी अशी विनंती केली. "तुम्ही काही काळजी करू नका, मी स्वतः त्या मेंढपाळ लोकांशी बोलतो आणि मदत करतो". असे आश्वासन संजय राऊत यांनी दिले आणि काही वेळातच सगळी सूत्रं हलवली गेली.

वीस मेंढपाळांच्या मदतीसाठी ज्यांचा संपर्क होत नव्हता ते आमदार, खासदार, कलेक्टर सगळी यंत्रणा तातडीने कामाला लागली. युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या आणि त्या वीस लोकांना खायला जेवण, महिनाभर आणि पुढेही पुरेल असा अन्न धान्याचा साठा देण्यात आला. मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या मेंढपाळांना मदत मिळाल्यानंतर त्यांचे अश्रू अनावर झाले आणि त्यांच्या मुखातून एक शब्द निघाला तो म्हणजे "सायेब आदी कुत्रं बी ईचारणा झालं नव्हतं... पण तासा दीड तासात फोन आले बगा कुणा कुणाचं, तुमचं लय उपकार . देव तुमाला काय कमी पडू देणार नाय". दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी 20 मेंढपाळांना वाचविण्यासाठी धडपड सुरू केली आणि त्यांना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मदत करून त्या वीस लोकांना पर्यंत वेळेत मदत पोहचवली.

संबंधित बातम्या :

माणुसकीला सलाम...! हिंदू व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार, मुंबई आणि सोलापुरात माणुसकीचे दर्शन

गुणवत्ता यादी लागूनही राज्यातील 129 परिचारिकांची नियुक्ती दोन वर्षांपासून प्रलंबित

Coronavirus | मुंबई पालिका कर्मचाऱ्यांकडून लोकांचं प्रबोधन; रस्त्यावर पेंटिंग रेखाटून जनजागृती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahavikas Aghadi Meeting : विदर्भातील काही जागांवर महाविकास आघाडीची चर्चा रखडलीSamruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?India vs Bangladesh, 2nd Test : 52 धावांची आघाडी, रोहित शर्माकडून डावाची घोषणाABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा
India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयावरून वाद पेटला, मनसेचा थेट मनपा अधिकाऱ्यांना घेराव, नेमकं काय आहे प्रकरण?
Ind vs Ban: कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
कसोटी हाय का टी-20, चौकार-षटकारांची आतषबाजी; 285 धावांवर भारताचा डाव घोषित
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
रोहित पवारांच्या मतदारसंघात रोहित शर्मा; स्टेडियमचं उद्घाटन, अकॅडमीत नवयुवकानां संधी
Baramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्या; हत्येमागील कारण समोर
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
'ह्या' प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर पाहा धर्मवीर 2; शिवसेनेच्या शितल म्हात्रेंकडून मोफत शो
Embed widget