एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगलीतल्या अष्टामधील निरंजन बिराजदारला दहावीत 35 टक्के गुण
सांगली : सांगलीतल्या आष्टामधील निरंजन बिराजदार या दहावीतल्या विद्यार्थ्याच्या अनोख्या यशाची जोरदार चर्चा सुरु आहे. राजाराम शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असलेल्या निरंजननं सर्व विषयांत 35 गुण मिळवले आहेत.
निरंजनला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या सर्व विषयात नेमके 35 गुण मिळाले आहेत. एकूण 500 पैकी 175 गुण मिळवत निरंजननं अनोखा विक्रम केला आहे.
निरंजनच्या घरची परिस्थिती हालाखीची असून, आई-वडील शेतात रोजंदारीवर कामाला जातात. त्याच्या या यशाबद्दल निरंजनच्या आई-वडिलांसह शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी सांगलीतील वांगी गावच्या अजय साळूंखेला 10 वीत 35 टक्के गुण मिळाले होते. यंदा ही मॅजिक फिगर वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील निरंजन बिराजदारने गाठली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement