सांगली: वकिलांची फी दिली नाही म्हणून मिरज न्यायालयाने मिरज महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीसह कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाने मिरज महापालिका प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली. न्यायालयाचे बेलीफ अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी गेल्यानंतर महापालिका प्रशासन जागे झाले. आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई सुरू असतानाच अतिरिक्त आयुक्त यांनी मध्यस्थी करत फिर्यादीना त्यांच्या रक्कमेचा चेक दिल्यानंतर या प्रकरणावर अखेर पडदा पडला.
मिरजेतील एका वकिलांची फी दिली नाही म्हणून मिरज महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या खुर्चीसह कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने मिरजेत एकच खळबळ उडाली. वसुलीसाठी जप्तीपथक मिरज मनपात आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त यांनी दोन लाखाचा चेक दिल्यानंतर न्यायालयाचे पथक माघारी गेले.
मिरजेतील वकील प्रशांत नरवाडकर हे गेले अनेक वर्षे महापालिकेच्या पॅनलवर काम करत होते. सदर कालावधीत त्याची फी महापालिकेने दिली नाही. याबाबत त्यानी मिरज न्यायालयात 2019 साली वसुलीचा दावा दाखल केला. न्यायालयाने 2021 रोजी महापालिकेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. परिणामी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मिरज न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका कार्यालयात न्यायालयाचे बेलीफ हे अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यासाठी आले होते.
त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजता न्यायालयाचे पथक महापालिकेत जप्तीसाठी दाखल झाले. यावेळी न्यायालयाचे बिलीफ यांनी अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई सुरू करत असताना अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांनी मध्यस्थी करत फिर्यादी यांना दोन लाखात तडजोड करून सायंकाळी 2 लाखाचा चेक दिल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. मात्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची जप्त करण्यास पथक आल्यामुळे महापालिका कार्यालयात एकच धावपळ उडाली होते. महापालिकेच्या कारभाराची लक्तरे निघाल्याने शहरात एकच खळबळ उडाली.
महत्त्वाच्या बातम्या: