एक्स्प्लोर

सांगलीत घडी घालताच पाचशेच्या नोटांचे तुकडे पडले, नागरिकांमध्ये खळबळ

एका महिलेला 500 रुपयांची नोट घडी पडून तुकडा पडल्याचे आढळले. जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांबाबत (म्हणजे तब्बल सात हजार रुपये) हा प्रकार घडला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विटा शाखाव्यवस्थापक दळवी यांनी संबंधित नोटा या केमिकलच्या अथवा अति उष्णतेच्या संपर्कात आल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला.

सांगली : पाचशे रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुटून पडण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतील विट्यात घडला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांना प्रात्यक्षिक दाखवलं आहे. जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांबाबत (म्हणजे तब्बल सात हजार रुपये) हा प्रकार घडला असून यासंदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी अनिल राठोड केली आहे. मात्र या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

नेमकं काय घडलं? अनिल राठोड यांच्या शेजारी एक वृद्ध महिला राहते. ती रोजंदारीवर मोलमजुरी करते. तिला दीड महिन्यापूर्वी सात हजार रुपये मिळाले होते. ते तिने पाकिटात घालून कपाटात ठेवले होते. काल (15 मे) त्यातील साडेतीन हजार रुपये बाहेर काढून रुमालात बांधून मिरच्या आणण्यासाठी बाजारात ती गेली. त्यानंतर रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून पाचशेची एक नोट काढताच 500 रुपयांची एक नोट घडी पडून तुकडा पडल्याचे आढळले. त्यानंतर तिने दुसरी नोट काढली असता ती नोट सुद्धा घडी पडताच तुटत असल्याचं आढळलं. घाबरुन त्या महिलेने सर्व नोटा घडी करुन पाहिले असता त्या नोटांचे तशाच प्रकारे तुकडे पडत असल्याचे दिसलं. यावर त्या महिलेने अनिल राठोड यांच्याकडे जाऊन घडला प्रकार सांगितला. त्यांनाही तशाच प्रकारे नोटांचे घड्या घालताच तुकडे पडत असल्याचं आढळलं.

सांगलीत चलनातून बाद झालेल्या एक कोटी रुपयांच्या नोटा जप्त, चौघांना अटक

बँक अधिकारी काय म्हणाले? यानंतर राठोड यांनी तात्काळ विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संपर्क साधला. तिथे शाखाव्यवस्थापक दळवी यांनी संबंधित नोटा या केमिकलच्या अथवा अति उष्णतेच्या संपर्कात आल्या असाव्यात, असा अंदाज व्यक्त केला. मात्र आमच्या शाखेत आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अशा प्रकारच्या नोटा या वर्षानुवर्षे कपाट बंद असतात त्यांना काहीही होत नाही, असं उत्तर दिलं. परंतु राठोड यांचं त्यावर समाधान झालं नाही. त्यांनी ही गोष्ट आपण रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निदर्शनास आणावी, असा आग्रह केला. त्यानंतर सध्या राठोड यांना पाचशे रुपयांची एक नोट जी बऱ्यापैकी एका बाजूने तुटली होती ती बदलून देण्यात आली आहे. परंतु उरलेले तीन हजार रुपयांचे तुकडे आम्ही बदलून देऊ शकत नाही, उत्तर बँकेकडून दिलं आहे.

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त, तिघांना अटक

नव्या नोटा हलक्या दर्जाच्या : शाखा व्यवस्थापक विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या पूर्वीच्या नोटांच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत, असं शाखा व्यवस्थापकांनीही मान्य केलं आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली असून अनेकांनी आपापल्या पाचशेच्या नोटा बदलून अथवा मोडून सुट्टे करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. याबाबत बँक ऑफ इंडिया अथवा संबंधित यंत्रणेने लक्ष घालावं, अशी मागणी होत आहे.

तोट्यातील 112 कोटी चलनात दाखवा, सुप्रीम कोर्टाचा आठ जिल्हा मध्यवर्ती बँकांना दिलासा

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

Embed widget