एक्स्प्लोर

Sangli Crime : सांगली जिल्हा हादरला! एकाच दिवशी दोन हत्या, एकाला प्रेमसंबंधातून तर दुसऱ्याला जुन्या वादातून संपवलं

सांगली जिल्ह्यामध्ये काल दोन हत्यांच्या (Sangli Murder) घटना घडल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोन हत्यांच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे

Sangli Crime :  सांगली जिल्ह्यामध्ये काल दोन हत्यांच्या (Sangli Murder) घटना घडल्यानं जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. एकाच दिवशी दोन हत्यांच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे. एक हत्या प्रेमसंबंधातून तर दुसरी दोन गटातील जुन्या वादातून झाली आहे. अनैतिक संबंधातून कर्नाटकातील एका तरूणाचा सलगरे गावच्या हद्दीत खून झालाय तर दुसरीकडे तासगाव शहरात जुन्या भांडणाच्या वादातून एकाचा रात्री खून करण्यात आला आहे. सलगरे खून प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीसांनी दोघा संशयितांना अटक केली असून दोघे जण फरार झाले आहेत. तर तासगावमधील खून प्रकरणी पोलीस हल्लेखोराच्या शोधात आहेत.

कर्नाटकातील तरूण, अनैतिक संबंधातून महाराष्ट्रात हत्या

अनैतिक संबंधातून कर्नाटकातील अथणी तालुक्यातील अरळहट्टी येथील संदीप आवळेकर (वय 33) या तरुणाची सलगरे गावच्या हद्दीत हत्या झाली. हा तरुण सलगरे येथील रूग्णालयात उपचारासाठी आला होता. उपचारानंतर रात्री दहा वाजणेच्या सुमारास मित्राच्यासोबत अरळहट्टी गावी दुचाकीवरून निघाला असताना  मागून आलेल्या दुचाकीवरील इसमांनी कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तो जखमी  होऊन दुचाकीवरून खाली कोसळला. जखमी अवस्थेत गावच्या दिशेने पळत निघाला असता दगडाला ठेचकाळून खाली पडल्यानंतर हल्लेखोरांनी पुन्हा कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तो जागीच ठार झाला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज असून अटक करण्यात आलेल्यांकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे पोलीसांनी सांगितले.या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीसांनी आकाश जाधव (रा. अरळहट्टी) आणि रामू इंगळे (रा. जकरहट्टी) या दोघांना अटक  केली आहे. 

दोन गटातील जुन्या वादातून शिवनेरी मंडळाच्या अध्यक्षाची हत्या, तासगावात तणाव

तासगाव शहरात दोन गटातील  जुन्या भांडणाच्या वादातून एकाचा खून करण्यात आला आहे. तासगाव मधील ढवळवेस भागामध्ये ही घटना घडली असून यात तासगाव मधील शिवनेरी मंडळाचे अध्यक्ष अनिल बाबासाहेब जाधव(वय 50) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज  तासगाव शहर बंदची हाक देण्यात आली आहे. सदर बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळ्यात आल्या असून सदरचा बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन शिवनेरी कला, क्रीडा मंडळाकडून करण्यात आलंय. तासगाव शहरात ढवळवेस येथे दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून दोन गटात वादावादी झाली होती. याच वादातून गुरुवारी दुपारी पुन्हा या दोन गटांतील कार्यकर्त्यांत वाद झाला. दुपारच्या सुमारास कोकणे कॉर्नरजवळ दोन गटांतील तरुणांत किरकोळ हाणामारी झाली होती. त्यानंतर पुन्हा या दोन गटांतील वाद उफाळला गेला. सायंकाळपर्यंत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ल्याची तयारी सुरू होती. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास पाऊस पडू लागल्यानंतर गर्दी पांगली गेली. अनिल जाधव यांच्यासोबत असणारे कार्यकर्ते निघून गेले होते. त्यानंतर काही वेळातच सुमारे पन्नासहून अधिक तरुणांच्या जमावाने ढवळवेसमध्ये प्रवेश करून अनिल जाधव यांच्यावर घरापासून काही अंतरावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला केला. हल्ला करून हल्लेखोर लगेचच पसार झाले. हल्ल्यानंतर जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नातेवाईक आणि जवळच्या लोकांनी त्यांना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट दिली. दखाखान्याबाहेरदेखील जाधव यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शहरात तणावपूर्ण वातावरण असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sanjay Raut Narayan Rane Defamation Case: नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
नारायण राणेंकडून कोर्टात सेटलमेंटची ऑफर, संजय राऊतांनी वेळ मागून घेतला, माझगाव कोर्टात नेमकं काय घडलं?
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Embed widget