एक्स्प्लोर

सांगली जिल्हा कोरोना रुग्णांची स्मशानभूमी होण्याची भीती; सदाभाऊ खोत मुख्यमंत्र्यांना पत्रातून वस्तुस्थिती कळवणार

सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दररोज 50-50 लोक मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी आता हवेत गोळीबार न करता, जमिनीवर या, अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सांगली : कोरोनाची दुसरी लाट येणार हे माहीत असून देखील राज्य सरकारने कोरोनाच्या बाबतीत काहीच उपाययोजना केल्या नाहीत, अशा शब्दात माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. तर सांगली जिल्हा कोरोना रुग्णांची स्मशानभूमी होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय.

सांगलीतील कोरोनाची परिस्थिती प्रशासनाच्या हाताच्या बाहेर  गेली आहे. मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून जिल्ह्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे याची देणार असल्याचंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

रेमडेसिवीर मिळाले नाही तर कोरोनाबाधितांसह मातोश्रीवर ठाण मांडू, सदाभाऊ खोत यांचा राज्य सरकारला इशारा

सरकारने जनतेला देवाच्या भरवशावर सोडून दिले आहे. सरकार सर्वच ठिकाणी ठोकशाही पद्धतीने काम करत असून दादागिरी करून काम करत आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे सरकार विसरून गेलेले आहे. तुम्ही गुंड, ठग म्हणून सत्तेवर  बसला नाहीत तर सेवक म्हणून बसला आहात याची जाणीव ठेवा असेही खोत म्हणालेत. 

सांगली जिल्हा कोरोना रुग्णाची स्मशानभूमी होण्याची भीती

सांगली जिल्हा कोरोना रुग्णाची स्मशानभूमी होतो का काय अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालीय. सांगली जिल्ह्यातील कोरोनाच्या उपाययोजना बाबतीत परिस्थिती प्रशासनाच्या हाताच्या बाहेर  गेली आहे. जिल्ह्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे याची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवणार आहे. एकीकडे रेमडीसीविर मिळत नाहीत तर दुसरीकडे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा  निर्माण झालाय. प्रशासन मात्र यामध्ये सरकारची आणि जनतेची देखील दिशाभूल करत आहे.

सांगली जिल्ह्यातील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची आणीबाणी आहे. ऑक्सिजन पूर्ण संपल्याने काही हॉस्पिटलमधील रुग्ण माझ्या डोळ्यासमोर दगावले आहेत. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज असते पण व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. मात्र काही मंत्री जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा असल्याचे सांगत आहेत. मग दररोज 50-50 लोक मृत्यूमुखी कशाने पडत आहेत. याला जबाबदार कोण, असा सवाल देखील खोत यांनी विचारला. त्यामुळे मंत्र्यांनी आता हवेत गोळीबार न करता, हवेत न बोलता जमिनीवर येऊन रुग्णालयांना भेटी दिल्यास सत्य परिस्थिती काय आहे हे कळेल असेही खोत म्हणाले. प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लँट उभारा हे आम्ही सहा महिन्यापूर्वीच सांगून देखील प्रशासनाने काही पाऊले याबाबतीत उचलले नाहीत. आज पालकमंत्री प्रत्येक तालुक्यात बैठका घेत आहेत. नुसत्या बैठका घेण्याऐवजी प्रत्येक तालुक्यात रेमडीसीविर, ऑक्सिजनचा पुरेसा साठा मिळवून द्या, असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
Beed Vaidyanatha Temple: राष्ट्रीय सुरक्षा पथक बीडमधील वैजनाथाच्या मंदिरात धडकलं, सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
राष्ट्रीय सुरक्षा पथक बीडमधील वैजनाथाच्या मंदिरात धडकलं, सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
Embed widget