एक्स्प्लोर
Advertisement
मगरीने कृष्णा नदीत ओढून नेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला!
सांगलीजवळच्या मौजे डिग्रज गावात कृष्णा नदी पात्रात वावरणाऱ्या मगरीने 12 वर्षीय आकाश जाधव हल्ला केला. काही महिन्यांपूर्वीच औदुंबरमधील नदी पात्रातून एका मुलाला मगरीने ओढून नेलं होतं. एका दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्या मुलाचा मृतदेहच नदी पात्रात सापडला होता. आता अशीच घटना पुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सांगली : कृष्णा नदी काठावरुन मगरीने ओढून नेलेल्या 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला आहे. वन विभाग आणि जीवरक्षक टीम कालपासून नदीपात्रात आकाश जाधवचा शोध घेत होते. अखेर 12 तासांनी आकाशचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. आकाश हा नदी काठावर वीटभट्टीचं काम करणाऱ्या कुटुंबातील मुलगा होता. तो मूळचा कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील आहे.
सांगलीजवळच्या मौजे डिग्रज गावात कृष्णा नदी पात्रात वावरणाऱ्या मगरीने 12 वर्षीय आकाश जाधव हल्ला केला आणि त्याला नदीत ओढून नेलं होतं. मात्र तो बाहेर न आल्याने अत्याधुनिक बोटींच्या मदतीने कालपासून त्याचा शोध सुरु होता.
सांगलीत मगरीची दहशत, 12 वर्षीय मुलाला नदीत ओढून नेलं
सध्या कृष्णेच्या नदीपात्रात मगरींचा प्रजननकाळ सुरु आहे. गुडघाभर पाण्यातही मगरींचा वावर दिसल्याने आसपासच्या लोकांनी तिथून पळ काढला. मात्र या लहानग्याला त्याची माहिती नसल्याने तो काठावरच बसून होता. गुरुवारी (16 मे) दुपारच्या सुमारास नदी काठावर येऊन मगरीने मुलाला ओढून नेले आणि काही वेळाने सोडूनही दिलं. पण हा मुलगा नदीच्या पाण्यात पडल्याने या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. तेव्हापासून वन विभाग आणि जीवरक्षक टीम मुलाचा शोध घेत होती. अखेर 12 तासांनी त्याचा मृतदेह या टीमच्या हाती आला.
काही महिन्यांपूर्वीच औदुंबरमधील नदी पात्रातून एका मुलाला मगरीने ओढून नेलं होतं. एका दिवसाच्या शोध मोहिमेनंतर त्या मुलाचा मृतदेहच नदी पात्रात सापडला होता. आता अशीच घटना पुन्हा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
संबंधित बातम्या
कृष्णा नदी पात्रात मगरींचं दर्शन, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
मगरीने ओढलेल्या मुलाचा मृतदेह अखेर सापडला
कृष्णा नदी पात्रात मगरीने मुलाला ओढलं, शोधमोहीम सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement