Shiv Jayanti 2022: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान प्रत्येकाच्या मनात आहे. आजच्या दिवशी बीड मधला समीर शेख नावाचा एक तरुण मागच्या नऊ वर्षापासून शिवनेरी किल्ल्या वरून शिवज्योत आपल्या आष्टी मधल्या सांगवी पाटण या गावी घेऊन जात आहे.
समीर शेख यांच्या घरावर भगवी पताका मानाने डोलतेय
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात आज साजरी होत आहे.. 50 तरुणांना सोबत घेऊन शिवजयंतीच्या आदल्या दिवशी समीर शेख शिवनेरीवर पोहोचला आणि शिवनेरी किल्ल्यावरून शिवज्योत पेटवून 200 किलोमीटरचा प्रवास करून सांगवी पाटण या गावी पोहचत आहे. शिवजयंतीचा महोत्सव जवळ येताच सांगवी पाटण मधल्या समीर शेख यांच्या घरावर भगवी पताका डोलताना पाहायला मिळतेय.. दिवाळी आणि ईद ला घरामध्ये सगळीकडे जसा आनंद पाहायला मिळतो तसाच आनंद शिवजयंतीला आमच्या घरात असतो अस मोठ्या अभिमानाने समीर शेख सांगतायेत..
महाराज हे कोण्या एका जाती धर्माचे नव्हते तर अखंड महाराष्ट्राचे दैवत...
दरवर्षी नित्यनियमानं समीर आपल्या मित्रांसोबत शिवनेरी किल्ल्यावर जातो शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर असलेली शिवज्योत तो आपल्या गावी घेऊन येतो आणि मोठ्या उत्साहात गावात शिवजयंती साजरी केली जाते. या दरम्यान अनेक सामाजिक संदेश देखील या प्रवासात अनेक युवकांना तो देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे कोण्या एका जाती धर्माचे नव्हते तर अखंड महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि प्रत्येकाने त्यांच्या जन्माचं स्वागत तेवढ्याच उत्साहात आणि जल्लोषात केलं पाहिजे असं समीरला वाटतं. म्हणून तो दरवर्षी आपल्या घरात मोठ्या उत्साहानं शिवजयंती साजरी करत आहे.
शिवजयंतीसाठी काय आहे नियमावली?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता पाचशे जणांना उपस्थित राहता येईल. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही शासनाकडून करण्यात आलं आहे. शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली होती. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योजी दौडीत दोनशे जणांना सहभागी होता येईल. तसेच शिव जन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीनिमित्त शिवरायांवर आधारित 'हे' सिनेमे पाहायलाच हवे