Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित अनेक मालिका आणि सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. शिवरायांचा इतिहास येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा यामागचा हेतू आहे. 


सिंहगड (Sinhagad) : बाबुराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेला 'सिंहगड' हा सिनेमा 1923 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात बाबुराव पेंटर आणि व्ही. शांताराम मुख्य भूमिकेत होते. 


बाळ शिवाजी (Bal Shivaji) : शिवरायांच्या बालपणीच्या पराक्रमावर भाष्य करणारा 'बाळ शिवाजी' हा सिनेमा आहे. हा सिनेमा 1981 साली प्रदर्शित झाला होता. प्रभाकर पेंढारकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 


छत्रपती शिवाजी (Chhatrapati Shivaji) : 'छत्रपती शिवाजी' या सिनेमाचे दिग्दर्शन भालजी पेंढारकर यांनी केले आहे. हा सिनेमा 1952 मध्ये प्रदर्शित झाला होता. 


कल्याण खजिना (Kalyan Khajina) : शिवाजी महाराजांनी कल्याणचा खजिना कसा लुटला ते कल्याण खजिना सिनेमात दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा 1924 साली बाबूराव पेंटरांनी दिग्दर्शित केला होता. 


शेर शिवाजी (Sher Shivaji) : 'शेर शिवाजी' हा सिनेमा 1987 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात स्मिता पाटील, श्रीराम लागू, रमेश देव, जयश्री गडकर, अमरिश पुरी मुख्य भूमिकेत होते. 


सर्जा (Sarja) : 'सर्जा' सिनेमा 1987 साली प्रदर्शित झाला होता. अजिंक्य देव, निळू फुले, रमेश देव, कुलदीप पवार आणि सीमा देव या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. 


मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (me shivajiraje bhosale boltoy) : एका मध्यमवर्गीय माणसाला शिवाजी महाराजांचे विचार कसे मदत करू शकतात हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. हा सिनेमा 2009 साली प्रदर्शित झाला होता. 


फर्जंद (Farzand) : फर्जंद सिनेमाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकरने केले आहे. हा सिनेमा 2018 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


फत्तेशिकस्त (Fatteshikast) : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' सिनेमा नोव्हेंबर 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता.


हिरकणी (Hirkani) : 'हिरकणी' सिनेमा 24 ऑक्टोबर 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि शिवाजी महाराजांची भूमिका प्रसाद ओकने साकारली होती. 


तान्हाजी (Tanhaji) : 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. 


पावनखिंड (Pawankhind) : स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. त्याच पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास 'पावनखिंड' सिनेमात पाहायला मिळणार आहे. पावनखिंड सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 





संबंधित बातम्या


TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Toolsidas Junior : 'तुलसीदास ज्युनियर' सिनेमाची रिलीज डेट ठरली, Sanjay Dutt स्नूकर परीक्षकाच्या भूमिकेत


Pawankhind : 'पावनखिंड' सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, लागला हाऊसफुल्लचा बोर्ड


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha