एक्स्प्लोर

कोल्हापूरच्या संभाजीराजेंचा उदयनराजेंना पाठिंबा!

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असताना आता खासदार संभाजीराजे छत्रपती हे उदयनराजेंच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत. उदयनराजेंच्या प्रत्येक अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे त्यांच्या सोबत असल्याचे संभाजीराजेंनी फेसबुकवरील पोस्टमधून सांगितले.

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असताना आता खासदार संभाजीराजे छत्रपती हे उदयनराजेंच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत. उदयनराजेंच्या प्रत्येक अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे त्यांच्या सोबत असल्याचे संभाजीराजेंनी फेसबुकवरील पोस्टमधून सांगितले. संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट
“काल रात्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी माझी चर्चा झाली.ज्या अडचणीचा ते सामना करत आहेत त्या अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे पुर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा हे छत्रपती घराण्याला चांगल माहित आहे. संकट ही आम्हाला नवीन नाहीत.लवकरच ते यामधून बाहेर येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.” -छत्रपती संभाजीराजे
याआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनीही उदयनराजेंचं समर्थन केले होते. कोल्हापूरच्या संभाजीराजेंचा उदयनराजेंना पाठिंबा! काय आहे प्रकरण? लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे. उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्जकेला होता. पण हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता उदयनराजे स्वत: पोलीस ठाण्यात हजर होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आले. पदयात्रेदरम्यान आमदार शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे भोसले यांचीही धावती भेट घेत विचारपूस केली. या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून सध्या चर्चेला उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Nagpur Crime News :एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
Mumbai Rain: पहिल्या झाडाची पाहणी सुरु असतानाच दुसरं झाडं कोसळलं, आठ मजूर जखमी; मुंबईच्या सांताक्रूझमधील घटना
पहिल्या झाडाची पाहणी सुरु असतानाच दुसरं झाडं कोसळलं, आठ मजूर जखमी; मुंबईच्या सांताक्रूझमधील घटना

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
Pune Rain Alert : पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Embed widget