एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सदाभाऊंच्या ताफ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दगडफेक

सदाभाऊ कुर्डुवाडीतील कार्यक्रमाला जात असताना, काही शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले.

पंढरपूर : स्वाभिमानीतून हकालपट्टी करण्यात आलेल्या कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. सदाभाऊ कुर्डुवाडीतील कार्यक्रमाला जात असताना, काही शेतकरी आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच त्यांना काळे झेंडे दाखवले. काही दिवसांपूर्वी गारपीटग्रस्त जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी देखील सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोषाचा सामना करावा लागला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना काळे झेंडे दाखवत, तीव्र विरोध केला होता. त्या धास्तीने सदाभाऊंना आपला गारपीटग्रस्त भागाचा दौरा अर्धवट सोडावा लागला होता. आजही अशाच प्रकारे पंढरपूर दौऱ्यावेळी सदाभाऊंना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्य कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला. कुर्डुवाडीमध्ये एका कार्यक्रमाला जात असताना, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंच्या ताफ्यावर दगडफेक केली. तसेच, त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या गाडीसमोर गाजरं फेकली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्या दगडफेकीत सदाभाऊंच्या ताफ्यातील एका गाडीचं नुकसान झालं आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील, संघटक महावीर सावळे, सिध्देश्वर घुगे, बापू गायकवाड, सत्यवान गायकवाड यांना ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget