(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सरकार आल्यावर मराठ्यांना OBC मधून आरक्षण देऊ असं शरद पवारांनी मनोज जरांगेंना लिहून द्यावं : सदाभाऊ खोत
शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange) लिहून द्यावं की, त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
Sadabhau Khot on Maratha Reservation : शरद पवार (Sharad Pawar) यांनी मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange) असं लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील मराठ्यांना आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ असेही सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) म्हणाले. जरांगे फॅक्टरचा सुद्धा महायुतीला तोटा झाल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. शरद पवार हे आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी करत असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.
मनोज जरांगे यांचे आंदोलन आता विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल
महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि त्यांचा सगळा कंपू हे आता मनोज जरांगे पाटलांना कामाला कामाला लावणार आहेत. मनोज जरांगे यांचे आंदोलन आता विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल असे खोत म्हणाले. आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी शरद पवार करत असल्याची टीकाही खोत यांनी केली.
दरम्यान, कांदा प्रश्नाचा, दूध, सोयाबीन याचा फटका या निवडणुकीत बसला
असल्याचे खोत म्हणाले.
महायुतीमधील सगळ्या घटकपक्षांनी प्रमाणिकपणाने काम केलं
महायुतीमधील आमच्या सगळ्या घटकपक्षांनी प्रमाणिकपणाने लोकसभेमध्ये काम केल्याचे खोत म्हणाले. आमच्या नेत्यांनी वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन सभा घेतल्या होत्या. विधानसभेला आम्ही निश्चितपणाने आमची भूमिका मोठ्या तिन्ही पक्षांच्या समोर मांडणार असल्याचे खोत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारे नेतृत्व
लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षीत यश मिळालं नाही. याबाबत देखील सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीला ज्या काही जागा कमी मिळाल्या त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मला सरकारमधून मला मुक्त करावं असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण निवडणुकीची सर्व जबाबदारी ही सर्वांची असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं असे सदाभाऊ खोत म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाची गरज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला असल्याचे सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.
महायुतीची आज बैठक आयोजीत केली होती. या बैठकीनंतर सदाभाऊ खोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. गेल्या 60 वर्षात शरद पवार यांनी मराठ्यांना चुना लावण्याचे काम केल्याचे वक्तव्य देखील सदाभाऊ खोत यांनी केले.
महत्वाच्या बातम्या: