Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी पोलंड देश पुढे सरसावला आहे. पोलंडकडून भारतीय नागरिकांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे. मात्र या निमित्ताने दुसऱ्या महायुद्धात भारतीयांनी पोलंडच्या नागरिकांना केलेल्या मदतीची आठवण झाली आहे. पोलंडमधील नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने मदत केली होती. साधारण पाच हजाराहून जास्त नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला होता. त्यावेळेपासून आजतागायत कोल्हापूर आणि पोलंडचे संबंध आहेत.


पोलंडवासी आणि कोल्हापूरच नातं दुसऱ्या महायुद्धपासूनच आहे. हिटलरच्या छळाला कंटाळून पोलंडचे नागरिक आश्रय शोधत होते. त्या वेळी केवळ कोल्हापूर आणि जामनगर संस्थानांनी यांना आश्रय दिला. 1943 ते 1948 दरम्यान कोल्हापूरच्या वळीवडे या ठिकाणी शहाजी महाराज यांनी पोलंडच्या नागरिकांसाठी वसाहत उभा केली. त्यामुळेच गेली 80 वर्षे पोलंडचे नागरिक कोल्हापूर संस्थानाचे ऋण व्यक्त करत आहेत.


राजाश्रय देणारं संस्थान म्हणून कोल्हापूर संस्थानाची देशातच नाही तर जगात ओळख आहे. त्याचं कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पोलंडचे नागरिक जगभर आश्रय मागत होते, कोणीही त्यांना आश्रय द्यायला तयार नव्हते. त्यावेळी पोलंडच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापुरात आश्रय दिला गेला.


ज्या पाच वर्षात पोलंडचे नागरिक कोल्हापूरमध्ये राहिले होते त्यावेळी त्यांनी काही नाते संबंध निर्माण केले होते. कोल्हापूरने नेहमीचं गरजूंना आपल्या पदरात घेतलंय. ज्या वेळी संपूर्ण जगाने पोलंडला नाकारलं होतं त्यावेळी कोल्हापूर संस्थानाने पोलंडच्या नागरिकांना आश्रय दिला. म्हणूनच कोल्हापूरच्या ऋणात कायम राहण्याचं पोलंडवासियांनी पसंत केलं.


संबंधित बातम्या: