Nagpur: नागपूर शहर हे क्राईम कॅपिटल म्हणून ओळखले जाते. नागपुरात दर दोन ते तीन दिवसांनी घडणाऱ्या हत्येच्या गुन्ह्यामुळे नागपूरला अशी ओळख मिळाली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नागपूर शहरात एका महिन्यापासून हत्येची एकही घटना घडलेली नाही. त्यामुळे किमान फेब्रुवारी 2022 मध्ये तरी क्राईम कॅपिटल नागपूर हत्यामुक्त शहर झाले आहे.
गेल्या 2 वर्षांपासून नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) आकड्यांनुसार नागपूर शहर देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत पहिल्या तीन शहरांमध्ये राहिला आहे... गेल्या वर्षी तर नागपूरने हत्येच्या घटनेच्या बाबतीत बिहार ची राजधानी पटण्याला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला होता. मात्र, त्याच नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात हत्येचा एक ही गुन्हा दाखल झालेला नाही. नागपूरकरांसाठी नक्कीच ही बाब दिलासा देणारी आहे..
नागपूर पोलिसांनी मानले नागरिकांचे आभार
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या संदर्भात नागपूरकरांचे आभार मानत संपूर्ण नागपूर शहर पोलीस दलाचे हे यश असल्याचे मत व्यक्त केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नागपुर शहरात अनेक मोठी हत्याकांड घडली ज्याने नागपूर पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. नागपूर शहर हत्यमुक्त ठेवण्यासाठी पोलिसांनी केलेले
पोलिसांचे विशेष प्रयत्न
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नागपूर शहरातील पाचही झोनच्या डीसीपी तसेच गुन्हे शाखेला त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले गेले होते. नागपूर पोलिसांनी फूट पेट्रोलिंग करत, बिट मार्शल ला सक्रिय केले होते, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे टीम तैनात करून गुन्हेगारांवर, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते. दामिनी पथकामार्फत महिला सुरक्षेवर भर देण्यात आले होते.
सामान्य जनतेचा सहकार्य ही मोलाचा
सामान्य जनतेचा विश्वास संपादन करण्यात गेल्या काही काळात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे सामान्य नागपूरकरांच्या सहकार्याने हे शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.
हे देखील वाचा-
- सुनेला सासरी न पाठवल्याचा राग! सासऱ्याकडून व्याह्याला कडकडून चावा, अकोल्यातील घटना
- Nagpur: 'मी काहीही चोरलेले नाही..., मात्र, तुम्ही भिकारी'; घरी काही मुद्देमाल न मिळाल्याने चोरांचा चिठ्ठीतून संताप व्यक्त
- Beed News Update : महिलेच्या खुनाने परळी पुन्हा हादरली, तीन दिवसांत तीन हत्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha