एक्स्प्लोर

Russia Ukraine War : अहमदनगरचे 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

अहमदनगर जिल्ह्यातील 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेले हे सर्व 18 विद्यार्थी युक्रेनच्या विद्यापीठात असल्यानं सुरक्षित आहेत

अहमदनगर : रशिया-युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले आहे. अशात अहमदनगर जिल्ह्यातील डॉक्टर एड्युकॉन एज्युकेशनल कन्सल्टन्सी संस्थेने 40 विद्यार्थी युक्रेनला पाठविले होते. त्यापैकी अहमदनगर शहर व जिल्ह्यातील 18 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. युद्ध परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. या एकाच संस्थेमार्फत 18 विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले आहेत, इतरही संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी युक्रेनमध्ये गेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाने मागवली आहे. 

दरम्यान,  युक्रेनमधील सर्व विद्यार्थ्यांशी त्यांच्या पालकांचा आणि संस्थेचा संपर्क सुरू असून, सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचे संस्थेचे डॉ. महेश झावरे यांनी ABP माझाशी बोलताना सांगितले आहे. सध्या जरी परिस्थिती ठीक असली तरी युद्ध स्थितीमुळे युक्रेनमधील मॉलमध्ये खाद्यपदार्थही मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची मागणी पालकांकडून होऊ लागली आहे. 

सुपर मार्केट बंद होत चालले आहेत : योगीता काळे

युध्द स्थितीमुळे युक्रेनमध्ये लोक चिंतेत आहेत. तेथील सुपर मार्केट बंद होत चालले आहेत. त्यातील किराणाही संपत चालला आहे. येथे वस्तू महाग मिळत आहेत. तसेच एटीएम बाहेर मोठ्या रांगा लागल्यात. भारतीय एटीएम कार्डही बंद पडत चालले आहे अशी प्रतिक्रिया एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या योगिता काळे या विद्यार्थिनीने दिली आहे.

जिथे असाल तिथेच थांबण्याचे भारतीय दुतावासाचा सल्ला

सध्या युक्रेनमध्ये जनजीवन काहीसं विस्कळीत झाले आहे. आमचे पालकही खूप चिंतेत आहेत. भारतीय दुतावासाकडून सांगण्यात आले हे की, आपण जिथे आहात तिथेच रहा, आम्हाला येथून बाहेर काढले जाईल. त्यासाठी आम्हाला युक्रेनच्या पश्चिम भागात नेण्यात येणार आहे. भारतीय दुतावासाने विमानाची सोय करून आम्हाला मायदेशी घेऊन जावे अशी विनंती वेदांती मुळे या  पुण्यातील विद्यार्थिनीने केली आहे.  सध्या सर्व विद्यार्थी सुखरूप असले तरी घरच्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून शासनाने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी घेऊन येण्याची विनंती पालकांकडून होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Embed widget