Russia Ukraine Crisis : युक्रेन आणि रशिया संघर्ष सुरु आहे. अशात अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. 1200 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून 320 विद्यार्थ्यांशी संपर्क झाला आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितले आहे.


मंत्री वड्डेट्टीवार यांनी सांगितले की, 'केंद्र सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. सध्या युक्रेनमधून विमान येणं अडचणीचं ठरत आहे. माझं युक्रेनमधील भारतीय नागरिकांना आव्हान आहे त्यांनी जवळच्या देशात जाऊन तिथून महाराष्ट्रात यावं. त्यांना भारतात आणण्याचं काम आम्ही करु. महाराष्ट्रामधून देखील विमान जाणार आहे. आम्ही केंद्राशी देखील याबाबात संपर्क ठेऊन आहोत.'


महाराष्ट्र सरकार सर्व मदत करत आहे, अशी माहिती मंत्री वड्डेट्टीवार यांनी दिली. 'राज्य सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी 02222027990 हा हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. तसेच 9321587143 या व्हॉट्सअप नंबरवरही संपर्क करता येईल. Control room@maharashtra. gov.in हा ईमेल उपलब्ध करून दिला आहे. यावर संपर्क करावा', असं आवाहन मंत्री वड्डेट्टीवार यांनी केले आहे. 


युक्रेनमधील सीमाभागाजवळ असणाऱ्या चेकपोस्टवरून पश्चिमेकडून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात येणार आहे. त्यानंतर बुडापेस्ट येथून विशेष विमानं असणार आहे. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणार आहे. सीमा भागात असणाऱ्या भारतीयांना प्राधान्य दिले जाणार आहे. भारतीयांना बाहेर पडताना आपल्या कॉन्ट्रॅक्टरसोबत संपर्कात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha