लातूर : कोरोना संसर्ग काळात जिल्ह्यातील अहमदपूर येथील एका मठात कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. कारण होते राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे जीवंत समाधी घेणार असल्याची अफवा. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली अन् लोकांची तुफान गर्दी झाली.
अफवेवर विश्वास ठेऊ नये असे पोलीस प्रशासनाने वारंवार सांगूनही लोकांनी गर्दी केली. याचं कारण शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या जीवंत समाधीची अफवा पसरली आणि हजारो लोक अहमदपूरला आले. दरम्यान, मी असे काहीही करणार नसल्याचे स्वतः . शिवलिंग शिवाचार्य महाराज स्पष्ट केलं आहे. त्यानंतरही लोक जायला तयार नव्हते. पोलिसांनी लोकांना या ठिकाणावरुन अक्षरशः हाकलुन दिले.
लातूरमधील 'या' शहरात बसवणार नाही गणपती, मंडळांचा स्तुत्य उपक्रम
कोण आहेत अहमदपरकर महाराज?
- लिंगायत समाजातील नावाजलेल्या महाराजापैकी एक. वयाच्या 104 वर्षीही ते कार्यमग्न असतात.
- अहमदपूर मठाशी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या भागातील भक्तगण जोडलेले आहेत.
- लोहार विद्यापीठात स्वतंत्र पूर्व काळात एमएमबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. लिंगायत धर्म प्रसारात ते सतत कार्यरत राहिले आहेत.
- वृक्ष जोपासना, राष्ट्र धर्म, राष्ट्रप्रेम या त्रिसूत्रीवर त्यांनी काम केले आहे. लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनात त्यांची भूमिका आणि सहभाग महत्वाचा होता. यासाठी राज्यभर लाखोंच्या मोर्चाचे त्यांनी नेतृत्व केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे उत्तम संबध आहेत.
या वर्षी श्रावण महिन्यात त्यानी तपनुस्थान केले होते. त्यानंतर प्रकृती अवस्थ होती. त्यातच ते जीवंत समाधी घेणार अशी चर्चा सुरु झाली. अल्पावधीत ही चर्चा जोर धरु लागली अन् चार राज्यातून भक्त मंडळी अहमदपूरच्या दिशेने निघाले. याची माहिती पोलीस प्रशासनास मिळाली. मात्र, तोपर्यंत हजारो लोक या ठिकाणी आले होते. महाराजांनी समाधी घेणार नसल्याचे सांगूनही लोक जात नव्हते. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत गर्दी हटवली.