उस्मानाबाद : लातूर जिल्ह्यातील एक मोठे सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या मुरुडमध्ये आज सार्वजनिक गणेश मंडळांची शांतता बैठक बोलावण्यात आली. त्यात अनेक गणेश मंडळांनी या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे एकही सार्वजनिक गणेश मंडळ गणपती बसवणार नसल्याचे सांगितले. परंतु त्याऐवजी प्रत्येक गणेशमंडळ एखादा समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचे गणेश मंडळांनी जाहीर केले.


दरवर्षी मुरुड शहरात परवानाधारक जवळपास 40 गणपती बसतात तसेच शहरातील प्रत्येक गल्लीत लहान-मोठे विनापरवाना असे सत्तर ते ऐंशी गणपती बसवले जातात. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट सर्वत्र पसरली असल्यामुळे मुरुड पोलीस स्टेशनचे सपोनि माधव गोमारे यांनी यावर्षी गणपती न बसण्याची संकल्पना गावातील नेतेमंडळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप दादा नाडे भाजपाचे जिल्हा उपप्रमुख हनुमंत नागटिळक शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बी एन डोंगरे यांच्याशी चर्चा केली चर्चेतून यावर्षी एकही मुरूडमध्ये सार्वजनिक गणपती बसणार नसल्याचे बैठकीत ठरले. परंतु हीच गोष्ट सार्वजनिक गणेशमंडळासमोर मांडणार असल्याचे अनेक गणेश मंडळांना समजले यातून मोठ्या गणेश मंडळांनी पुढाकार घेत आम्हीच यावर्षी एकही गणेशाची स्थापना करणार नसल्याचे जाहीर केले.


1990 पासून मुरूडमध्ये मोठ्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली होती. 1991 पासून हालत्या देखाव्याला सुरुवात झाली. त्यानंतर 2005 मध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना मुरूडमध्ये राबविण्यात आली होती. त्यात पुढाकार म्हणून तात्कालीन गणेश मोरे, तात्कालीन सरपंच दिलीप दादा नाडे व नरसिंह कद्रे यांच्या पुढाकाराने ही यशस्वीही झाली होती. त्यानंतर मात्र मुरूडमध्ये अनेक परवानाधारक गणपती बसले जातात. मागच्या वर्षी मुरूडमध्ये 40 परवानाधारक गणपती बसले होते तर गल्लीत लहान-मोठे असे मिळून विना परवानाधारक शंभरच्या आसपास संख्या होती. यावर्षी सर्वांनीच मिळून एकही ही सार्वजनिक गणपती न बसण्याचा संकल्प केला व त्याऐवजी प्रत्येक गणेश मंडळाने समाजहिताचा एखादा उपक्रम राबवण्याचा निर्धारही व्यक्त केला. त्यामुळे एवढ्या मोठ्या मुरुड शहरात राबवलेला उपक्रम जिल्ह्यात ही राबवला पाहिजे. तरच कोरोना काळात जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व प्रशासनाला मोठा धीर मिळणार असून कोरोनाचेही संक्रमण रोखण्यास मदत होऊन प्रशासनाचे मोठे काम हलके होणार आहे.


Ganeshotsav 2020 |पुण्यात मानाचे पाच गणपती मंडळ देखावा उभारणार नाही,मंदिरातच मूर्ती बसवण्याचा निर्णय