एक्स्प्लोर
ठाण्यात बँकांत पैसे भरणाऱ्या कंपनीवर दरोडा, 12 कोटींची लूट

ठाणे : बँकांमध्ये पैसे पुरवणाऱ्या चेकमेट प्रायव्हेट सर्विसेस या कंपनीवर आज पहाटे सशस्त्र दरोडा पडलाय. तीन हात नाका परिसरात आज पहाटे 4 वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे. 7 ते 8 इसमांनी चाकू, चॉपर, बंदुकीचा धाक दाखवून लूट केल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर चोरट्यांनी सीसीटीव्हीसह पोबारा केला आहे. हा प्रकार घडला तेव्हा कंपनीत दोन सुरक्षा कर्मचारी हजर होते. कंपनीत हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार चोरट्यांनी 12 कोटींची रक्कम पळवली, मात्र याला ठाणे पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाहीये. ठाणे मेंटल हॉस्पिटल रोड जवळ एका सोसायटीत या कंपनीचं कार्यालय आहे. स्टँडर्ड चार्टर्ड, आयसीआयसीआय, येस बँक सारख्या नामवंत बँकांसाठी ही कंपनी काम करते.
Before You Go
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















