एक्स्प्लोर

चोर तर चोर, वर शिरजोर! रक्कम न मिळाल्यानं चोरटे म्हणाले, 'या घरातील लोक भिकारी'

Robbery in Kolhapur : कोल्हापूरमधील एक दरोडा चर्चेत आला आहे. चर्चेचे कारण दरोड्यातील रक्कमेवरबद्दल नसून चोरांनी लिहिलेला मेसेज आहे.

Robbery in Kolhapur : कोल्हापूरात सध्या एका मेसेजची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला कारणही तसेच आहे. हा मेसेज चोरट्यांनी दरोडा टाकलेल्या घराच्या भिंतीवर लिहीला आहे. त्यामुळे या मेसेजची चर्चा कोल्हापूर शहरामध्ये वार्‍यासारखी पसरली आहे.  घरफोडी केल्यानंतर आपल्याला मोठा ऐवज किंवा मोठी रक्कम लंपास करता येईल, अशी चोरट्यांना अपेक्षा होती. मात्र, हातीच काही न लागल्याने नाराज झालेल्या चोरट्यांनी शिरजोरी दाखवत या घराचा मालक भिकारी असल्याचे लिहून पसार झाले.  

कोल्हापूरमधील आर.के.नगरमध्ये ही घटना उघडकीस आली. उमेश शेंडगे हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूरच्या आर. के. नगर येथील भारत माता कॉलनीत राहतात. त्याची दोन्ही मुले शिक्षण आणि नोकरी निमित्त परगावी आहेत. चार दिवसापूर्वी उमेश शेंडगे हे घरगुती कामानिमित्त आपल्या पत्नी समवेत कागल तालुक्यातील सोनाळी इथं गेले होते. या दरम्यान गुरुवारी रात्री अज्ञातांनी शेंडगे यांच्या घराचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कुलूपबंद असलेल्या घरात मोठा ऐवज सापडेल अशी चोरट्यांना अपेक्षा होती. त्यातून त्यांनी घरातील सर्व साहित्य विस्कटून टाकले. घरात शोधाशोध केली. मात्र, अपेक्षे इतकी त्यांच्या हाती मोठी रक्कम लागली नाही. चोरट्यांनी घरातील कपाट उघडून सगळं साहित्य विस्कटून टाकलं. अखेर त्यांनी पर्समधील सोन्याचं मंगळसूत्र आणि 7 हजाराची रोकड लंपास केली. 

या चोरट्यांना या बंगल्यात अपेक्षित मौल्यावान वस्तू न मिळाल्यानं त्यांचा अपेक्षाभंगच झाला. या घरातून जाताना चोरट्यांनी घरातील भिंतीवर या घरातील लोक भिकारी आहेत, असा मजकूर लिहून पसार झाले. 

दरम्यान, शुक्रवारी सायकाळी घरमालक उमेश शेंडगे हे परगावाहून आल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी उमेश शेंडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Washim News: सततची नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर अन् त्यात दुष्काळाचं भीषण चक्र; बळीराज्याच्या संयमाचा बांध फुटला, विष प्राशन करून जीवन संपवलं, वाशिमच बोर्डी हादरलं!
सततची नापिकी, वाढता कर्जाचा डोंगर अन् त्यात दुष्काळाचं भीषण चक्र; बळीराज्याच्या संयमाचा बांध फुटला, विष प्राशन करून जीवन संपवलं, वाशिमच बोर्डी हादरलं!
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला; विजयादशमी, विद्यार्थी आंदोलन, दुष्काळ ते देशातील राजकीय परिस्थितीवर नागपुरातील संघ मुख्यालयात मंथन?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांच्या भेटीला; विजयादशमी, विद्यार्थी आंदोलन, दुष्काळ ते देशातील राजकीय परिस्थितीवर नागपुरातील संघ मुख्यालयात मंथन?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Embed widget