एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
कसारा घाटात रस्ता खचला, एकेरी मार्ग सुरु असल्याने वाहतूक खोळंबली
या रस्त्याच्या खाली पाणी किती मुरले आहे तसेच दगड, माती, मुरूम कुठपर्यंत आहे याची पाहणी केली जात आहे. पाहणी केल्यानंतर त्या पद्धतीने पुढील कामाची रूपरेषा ठरवली जाणार आहे.
![कसारा घाटात रस्ता खचला, एकेरी मार्ग सुरु असल्याने वाहतूक खोळंबली Road cracks in Kasara Ghat, traffic jam one-way lanes started कसारा घाटात रस्ता खचला, एकेरी मार्ग सुरु असल्याने वाहतूक खोळंबली](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/08/03085252/Web-kasara.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावर कसारा घाटात रस्ता खचल्यानं दुरुस्तीचं काम सुरु आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून बंद असणारा कसारा घाट कमीतकमी पुढील दहा दिवस तरी बंद राहणार असल्याची माहिती आहे. कसारा घाटात रस्त्याला लांबच लांब आणि पाच फुट खोल भेगा पडल्या आहेत. या भेगा बुजवण्याचं तात्पुरत्या स्वरुपाचं काम करण्यात आला होता. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्यानं कायमस्वरूपी टिकेल असं काम करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. यामुळे सध्या एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक केली जात असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे.
मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावर कसारा घाटात रस्ता अतिशय धोकादायक पद्धतीने खचला आहे. घाटात रस्त्याला लांबच लांब भेगा पडल्या आहेत. या रस्त्याच्या खाली पाणी किती मुरले आहे तसेच दगड, माती, मुरूम कुठपर्यंत आहे याची पाहणी केली जात आहे. पाहणी केल्यानंतर त्या पद्धतीने पुढील कामाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. त्यामुळे सध्या एकाच मार्गावरून दुहेरी वाहतूक केली जात आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. सध्या घाटात भर पावसात देखील काम सुरु आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)