Raigad Pune Road Update: रायगड आणि पुण्यादरम्यान असलेल्या वरंध घाटात (Raigad Pune Road Varandh Ghat)दरडी कोसळण्याचा धोका असल्याने गणेशोत्सवापूर्वी खबरदारी घेण्याची मागणी करण्यात येत आहे. महाड ते पुणे दरम्यान असलेल्या वरंध घाट हा दक्षिण रायगडमधील रहिवाशांसाठी सोयीचा मार्ग मानला जातो. त्यातच, गेल्या महिन्यापूर्वी वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्याने वरंध माझेरी मार्गे भोरघाट मोठ्या वाहनासाठी बंद करण्यात आला आहे. त्यातच, वरंध घाटामधील वळणावर दोन ठिकाणी रस्ता खचण्याचा आणि संरक्षक भिंतीलगत दरड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे, घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.
या संभाव्य दरड कोसळण्याच्या व लगत असलेल्या रस्ता खचण्याची खबर राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आली असून आगामी आठ दिवसात येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी या ठिकाणी अत्यावश्यक असलेली खबरदारी घेऊन नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी माझेरी, पारमाची आणि वरंध परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
तर, या संभाव्य घटनेची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आली आहे. तर, गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावर आल्याने या ठिकाणी आवश्यक खबरदारी घेऊन नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या