Mumbai-Goa Highway : आपलं कोकणाला (Konkan) निसर्गनिर्मित स्वर्ग म्हटलं जातं. स्वर्ग गाठण्यासाठी ज्या प्रकारे तपश्चर्या करावी लागते, अनेक खडतर आव्हाने पार करावी लागतात, त्याचप्रकारे कोकणच्या या निसर्गनिर्मित स्वर्गात पोहोचण्यासाठी देखील मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) खडतर आव्हाने पार करावे लागणार आहेत. कोकणातला चाकरमानी तर गेल्या बारा वर्षांपासून म्हणजेच एक तप तपश्चर्या करतोय. पण कोणास ठाऊक काय झाले त्याचा लाडका बाप्पा अजून त्याला पावला नाही. अजूनही मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्त्वास आलेला नाही. या महामार्गावरुन चाकरमानी जाण्याच्या आधीच 'एबीपी माझा'ने मुंबई ते सावंतवाडीपर्यंत प्रवास करुन रस्त्याची सध्याची अवस्था दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 


पुन्हा एकदा गणेशोत्सव आला. कोकणातला चाकरमानी मिळेल त्या मार्गाने गावी जायची तयारी करु लागला. आपल्या लाडक्या गणपतीला लागणारे सगळं साहित्य त्याची खरेदी त्यानंतर बॅगची पॅकिंग पण आता पूर्ण झाली. आता फक्त एसटी, लक्झरी बस नाहीतर स्वतःच्या चार चाकीमध्ये बसायचं आणि थेट कोकण गाठायचं अशा विचारात चाकरमानी असतील. पण थांबा त्याआधी ज्या महामार्गावरुन तुम्ही जाणार आहात त्याची परिस्थिती काय आहे हे पाहिलेत का? कारण ज्या पनवेलपासून उजव्या हाताला तुम्ही कोकणात जायला वळणार आहात तिथून पुढचा 84 किलोमीटरचा पहिला टप्पाच अजून चौपदरीकरण करुन पूर्ण झालेला नाही. मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण करण्याचा निर्णय 2010 साली घेण्यात आला. त्यामध्ये वेगवेगळे टप्पे ठरवण्यात आले आणि त्या टप्प्यानुसार कंत्राट देण्यात आले होते. 


चौपदरीकरणाचे टप्पे 
- पनवेल ते इंदापूर, 84 किमी, अपूर्ण, सुप्रीम इन्फ्रा, नंतर जे एम म्हात्रे आणि आता रामेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनी
- इंदापूर ते वडपाले, 26 किमी, अपूर्ण, चेतक अप्को 
- वीर ते भोगाव खुर्द,(पोलादपूर) 38 किमी, जवळ पास पूर्ण, एल अँड टी कंपनी 
- भोगाव खुर्द ते खवटी (काशेडी घाट) 8 किमी, बोगद्याचे काम सुरू, 70 टक्के पूर्ण, रिलायन्स इन्फ्रा 
- कषेडी ते परशुराम घाट,(खेड) 41 किमी, काम अपूर्ण, कल्याण टोलवेज कंपनी 
- परशुराम घाट ते अरवली,(चिपळूण)34 किमी, खूप रखडलेले काम, इगल चेतक इन्फ्रा 
- अरवली ते कांटे, (संगमेश्वर) 40 किमी, फक्त 20 टक्के काम पूर्ण आधी एमईपी sanjose कंपनी, आता रोडवेज सोल्युशन प्रा लि, आणि सब काँट्रॅक्ट जे एम म्हात्रे कंपनी 
- कांते ते वाकेड (लांजा), 49 किमी, 15 टक्के पूर्ण, आधी एमईपी sanjose कंपनी, मग रॉडवेज सोल्यूषण प्रा लि, सब काँट्रॅक्ट आता Han infra सोल्यूशन
- वाकड ते तळगाव, 33 किमी, 99 टक्के काम पूर्ण, केसीसी बिल्डकोन 
- तळगाव ते कलमठ, 38 किमी, 98 टक्के पूर्ण, केसीसी बिल्डकोन कंपनी 
- कलमठ ते झाराप, 44 किमी, 99 टक्के पूर्ण, दिलीप बिल्डकोन कंपनी 


आतापर्यंत अनेक कंत्राटं देऊन झाले, लोकप्रतिनिधी बदलले, तब्बल 17000 कोटी रुपये खर्च झाले, पण हा रस्ता अजूनही पूर्णत्वास आलेला नाही. 


- पळस्पे फाटा, इथूनच मुंबई-गोवा हायवे सुरु होतो, तिथेच खड्डे, प्रवासाची सुरुवातच खराब होते. 


- वडखळ नका ब्रीज - वडखळ इथेच खूप ट्रॅफिक व्हायचे, पण आता होणार नाही, कारण बाहेरुन एक बायपास तयार करण्यात आला आहे.


- वडखळ समोरील ब्रीज खड्डे भरताना - एक वर्षांपूर्वी बांधलेली ब्रीजवर खड्डे दगड आणि मातीने भरले जात आहेत.


- पनवेल ते इंदापूर हे काम अपूर्ण आणि अर्धवट आहे, मधल्या पॅचेसमध्ये काम झाले आहे त्यामुळे ठिकठिकाणी रस्ता वळवला आहे.


- चाकरमानी तरी गणपतीसाठी फक्त गावी जात आहेत, पण या रस्त्याच्या बाजूला राहणारे लोक यावरुनच दिवस रात्र प्रवास करतात, त्यांची पाठ, कंबर, मणका त्यामुळे दुखू लागतात, काहींना लाखो रुपये खर्च करुन ऑपरेशन करावे लागले.


- नागोठणे स्टेशन - महामार्ग एका लेवलने बांधायला हवा, मात्र कामच अपूर्ण असल्याने हा महामार्ग उंच सखल आणि अर्धा सिमेंट काँक्रिट आणि डांबरने बांधला आहे.


-अदृश्य ब्रीज - महामार्गावर बांधलेले ब्रीज त्याचा वेग वाढवतात, पण पहिल्या टप्प्यातच अजून असंख्य ब्रीज अर्धवट आहेत, अनेक वर्षापासून अर्धवट आहेत.


- याच महामार्गावर असलेल्या एका अमित मेहता या डॉक्टरने रोजच्या पेशंटमध्ये दिवसाला 4 ते 5 अपघात आणि कंबरदुखीचे पेशंट येत असतात हे सांगितले
 
- विविध टप्प्यात या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम दिले गेले, त्यातला रायगडमधला वीर ते पोलादपूर हाच टप्पा, एल अँड टी कंपनीनं बांधला, त्यावर खड्डे नाहीत


- कशेडी घाट डोकेदुखी होती, मात्र आता नव्या बोगद्यामुळे ती डोकेदुखी पुढील वर्षी संपणार आहे
 
- खेडच्या भरणा नाक्यावर वाहतूक कोंडी होणार हे निश्चिक आहे.
 
- परशुराम घाटात रुंदीकरणाचे काम रखडले आहे, धोकादायक झालेला हा घाट संध्याकाळपासून ते सकाळपर्यंत बंद ठेवतात, त्यामुळे स्थानिकांचे खूप हाल होत आहेत.
 
- परशुराम घाटात वाहनांचे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे, कारण अर्धवट काम, त्यात घाट रात्री बंद ठेवला तर पर्यायी मार्ग ही वाहतूक चालवू शकतो का हा प्रश्न आहे
 
- या घाटासाठी दिलेल्या पर्यायी मार्गावर, पण खड्डे आहेत, त्यामुळे स्थानिक रिक्षाचालकांनी लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले आहे


- वाशिष्ठी नदीवरील या ब्रिजच्या लोखंडी सळ्या एका वर्षात दिसू लागल्या आहेत, बाजूला ब्रिटिश कालीन ब्रीज आहे, तो चांगला आहे


- बहादूर शेख नाका चिपळूण - हा नाका महत्त्वाचा आहे कारण कराड आणि चिपळूण अशी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणारा कुंभार्ली घाट इथे सुरु होतो, पण रस्ता खराब आहे, ब्रीज अपूर्ण आहे, त्यामुळे चाकरमान्यांची वाट बिकट आहे,


- 1937 साली बांधलेल्या या शास्त्री पुलावरुन वाहतूक सुरु आहे, हा कधीही कोसळेल, एकावेळी एकच अवजड वाहन जाऊ शकते, यांच्या बाजूलाच नवीन पूल आहे, 10 टक्के काम बाकी आहे, पण तो कंत्राटदार पूर्ण करत नाही. 


- याच्या शेवटच्या भागात या कंत्राटदाराने स्वतः मान्य केले आहे की खड्डे आहेत, माझी पण कंबर दुखते, काम नीट झालेले नाही, यांच्याकडेच पहिल्या टप्प्याचे दुसरे कंत्राट होते, पण काम पूर्ण केलेले नाही, आता तिसरा कंत्राटदार आहे तिथे, तर याला आता नवीन कंत्राट दिले संगमेश्वर इथले


- MEP कडे कंत्राट असलेल्या या रस्त्यावर कामच झालेले नाही, त्यामुळे रस्त्यात खड्ड्यांचे साम्राज्य आहे.


- गणपती पुळेकडे जाणारा महामार्ग खराब आहे.


- पाली हे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे गाव आणि मतदारसंघ, त्यांच्या घराच्या काही अंतरावरच मोठ मोठे खड्डे आहेत, चाकर मान्यांना इथे खूप त्रास होणार आहे, हे तिथल्या सरपंचाने पण मान्य केले आहे


- लांजा महत्त्वाचे शहर, पण इथेही ब्रिजचे काम अर्धवट, कंत्राटदार नाहीय, रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे,


- वाकड - इथून थेट महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत रस्ता चांगला आहे,