मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठापुढे....आजच्या सुनावणी  अनिश्चितता कायम 


   23 ऑगस्टला सुप्रिम कोर्टात झालेल्या सुनावणीत महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचे प्रकरण खंडपीठीकडे पाठवण्यात आलाय.  आज पाच सदस्यांच्या खंडपीठापुढे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची पहिली सुनावणी होणार आहे. या खंडपीठात कोण कोण न्यायमुर्ती असणार? खंडपीठ कोण कोणत्या विषयावर सुनावणी करणार?  ही सुनावणी कालबद्ध असणार का? या सर्व गोष्टींवर आज स्पष्टता येण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना कोणाची या बाबात निवडणुक आयोगात सुरू असलेल्या याचिकेचं काय होणार यात स्पष्टता येण्याची शक्यता.


 राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस


 शिदें सरकारचे पहिले अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान झाले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे, याला मुख्यमंत्री उत्तर देतील. हे उत्तर देताना सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे.


राज ठाकरे अँक्शन मोडवर


राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आले आहे.  शस्त्रक्रिया आणि विश्रांती अशा दोन महिन्याच्या कालावधीनंतर राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आलेत.   मुंबईत दोन दिवस पदाधिकारी बैठक आणि मेळव्यानंतर आज ते पुण्यात असणार आहेत.  पुण्यातून आज मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी शुभारंभाला राज ठाकरे उपस्थित रहाणार आहेत. पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.


बिल्कीस बानोने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी


सन 2002 सालच्या गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात गर्भवती असलेल्या बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार झाला झाला होता बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी जन्मठेप भोगत असलेल्या 11 जणांची सुटका करण्यात आली आहेत. या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाविरोधात बिल्कीस बानोने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी होणार आहे


पीएमएलए कायद्यातील  तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज  सुनावणी


Prevention of Money Laundering Act (PMLA) कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे


पेगॅसीस प्रकरणी आज सर्वोच्च न्यायलयात 


देशभरातील 40 हून अधिक पत्रकार आणि महत्वाच्या नेत्यांवर पाळत ठेवल्या प्रकरणी चर्चेत आले.  पेगॅसस स्पायवेअरसंबंधी स्थापन केलेल्या स्वतंत्र समितीने त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. आज या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.


आज गुरु पुष्यामृत योग 


आज गुरु पुष्यामृत योग आहे. या दिवशी सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असल्याची अनेक ग्राहकांची श्रद्धा असल्याने या निमित्ताने सोने खरेदी साठी ग्राहक सोन्याच्या दुकानात गर्दी करीत असतात.