एक्स्प्लोर

सीएएविरोधात परभणीतील दोन नगरपरिषदांमध्ये ठराव संमत, भाजपचा एक नगराध्यक्ष, एक उपनगराध्यक्ष निलंबित

देशात एकीकडे सीएए आणि एनआरसीवरुन वातावरण तापलेलं असताना भाजपच्या ताब्यातल्या नगर पालिकेनं असा ठराव मंजूर केला आहे. विशेष म्हणजे भाजपचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनीच खुद्द सीएए विरोधी ठराव मांडला.

परभणी : सीएएविरोधात नगरपरिषदेत ठराव करणाऱ्या परभणीतील दोन नगराध्यक्षांवर भाजपनं निलंबनाची कारवाई केली आहे. पालम नगरपरिषदचे नगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे आणि सेलू नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष विनोद बोराडे यांना पक्षातून निलंबित केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात एनआरसीविरोधात भाजपचीच सत्ता असलेल्या सेलू आणि पालम नगरपरिषदेत ठराव मंजूर करण्यात आला होता. 28 फेब्रुवारीच्या परभणीच्या सेलू नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव संमत झाला आहे. सेलू नगरपालिकेत भाजपची सत्ता असताना आता तिथेच सीएए आणि एनआरसी विरोधात ठराव झाला आणि तो संमतही झाला. सदस्यांशी चर्चा करून तो 28 पैकी 26 अशा मताधिक्क्यानं पारितही झाला. त्यामुळे या निर्णयाची सध्या जिल्हाभर चर्चा आहे. नगराध्यक्ष विनोद बोराडे हे भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या या निर्णयामुळे मेघना बोर्डीकर देखील अडचणीत येऊ शकतात. सीएएविरोधात परभणीतील दोन नगरपरिषदांमध्ये ठराव संमत, भाजपचा एक नगराध्यक्ष, एक उपनगराध्यक्ष निलंबित विशेष म्हणजे 28 पैकी 26 नगरसेवकांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. केवळ शिवसेनेचे नगरसेवक मनीष कदम आणि आशा दिशागत यांनी पक्षाची भूमिका पक्षश्रेष्ठींना विचारून मग आपली भूमिका मांडणार असल्याचे सांगून स्वाक्षऱ्या केल्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे हा ठराव घेतल्याचे अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. सीएएविरोधात परभणीतील दोन नगरपरिषदांमध्ये ठराव संमत, भाजपचा एक नगराध्यक्ष, एक उपनगराध्यक्ष निलंबित बोराडेंचा नुकताच फडणवीसांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचे एक हाती वर्चस्व आहे. विनोद बोराडे आमदार मेघना बोर्डीकर तथा त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर झालेल्या महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या अठरा नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. दुसरीकडे पालम नगर पंचायतीमध्ये शहर विकास आघाडीची सत्ता आहे. तर भाजपकडे पालममधील उपनगराध्यक्ष पद आहे. पालम नगर पंचायतीमध्येही 2 मार्चला अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेतदेखील सीएए विरोधात ठराव घेण्यात आला. यामुळे भाजपाचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब गणेश रोकडे यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने सीएएविरोधात ठराव घेऊन त्याचं समर्थन केल्यामुळे रोकडे यांनाही निष्कासित केलं आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिकृत पत्र काढत दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget