एक्स्प्लोर

सर्व महापालिकांच्या निवडणुकांसाठी 7 ऑक्टोबरला आरक्षण सोडत

मुंबईः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत 3 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 ऑक्टोबर 2016 रोजी आरक्षण सोडत काढण्यात येईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.   आरक्षण सोडत जाहीर केल्यानंतर प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, असंही सहारिया यांनी सांगितलं. मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 10 महापालिकांची मुदत मार्च-एप्रिल 2017 मध्ये संपत आहे.   महापालिकेची सदस्य संख्या 2011 च्या लोकसंख्येनुसार   निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चितीचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मुंबई महापालिकेची सदस्य संख्या अधिनियमात 227 एवढी निश्चित केली आहे. उर्वरित महापालिकांसाठी 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे सदस्य संख्या निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रभाग रचना करण्यात येणार आहे.   मुंबई महापालिकेची प्रभाग रचना एक सदस्यीय, तर अन्य सर्व महापालिकांची प्रभाग रचना बहुसदस्यीय पद्धतीने केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेस 23 सप्टेंबर 2016 पर्यंत मान्यता देण्यात येणार आहे.   असं आहे आरक्षण सोडतीचं वेळापत्रक   आरक्षण आणि प्रभाग रचनेबाबत मुंबईसाठी 5 ते 20 ऑक्टोबर, तर उर्वरित महापालिकांसाठी 10 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत संबंधित महानगरपालिकेत हरकती आणि सूचना दाखल करता येतील.   राज्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत कलेले अधिकारी त्यावर 4 नोव्हेंबर पर्यंत सुनावणी देणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी 5 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी होईल.   मुंबईची 22 नोव्हेंबरला, तर उर्वरित महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 25 नोव्हेंबर 2016 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Embed widget