Mohan Bhagwat: रिलीजन म्हणजे धर्म नाही, भारतातले सर्वधर्मीय हे हिंदुच- मोहन भागवत
Mohan Bhagwat: एका मराठी दैनिकाच्या आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
Mohan Bhagwat: रिलीजन हा शब्द म्हणजे धर्म नाही. धर्म ही एक खूप विशाल कल्पना आहे. आपल्या देशात कोणताही हिंदू नावाचा रिलिजन नाही. याउलट आपल्या देशात अनेक रिलिजन असले तरी ते सर्व हिंदू स्वभावाचे रिलिजन आहेत. त्यामुळे ते हिंदू आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. एका मराठी दैनिकाच्या आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सरसंघचालक यांच्या व्याख्यानाचा विषय हिंदुत्व आणि राष्ट्रीय एकात्मता असा होता.
"भारतात असलेल्या विविध रिलिजनचा स्वतंत्र अस्तित्व मान्य केला जात असला तरी त्या सर्व रिलिजनचा स्वभाव एक सारखा म्हणजेच सर्वसमावेशक आहे. आपण सर्वांनी असा विचार केला तर मग कोणताही भांडण असण्याचे कारण नाही", असे मोहन भागवत म्हणाले.
"भारतातून निघालेल्या सर्व विचार प्रवाह त्यांच्या विचाराबद्दल आग्रही असले, परस्पर विरोधी असले तरी ते असहिष्णु नाहीत. ते सर्व विचारप्रवाह सर्वसमावेशक आहेत. हिंदुत्व रिलिजन नाही, तो पूजा पद्धती रूढी-परंपरा, खाद्य पद्धतीमध्ये अडकलेला नाही. उलट हिंदुत्व म्हणजे धारण करणारा नियम आहे. त्यालाच आपण धर्म म्हणतो", असे ही मोहन भागवत म्हणाले.
"सावरकरांनीही म्हंटलं होतं, ज्या दिवशी हिंदू समाज आणि राष्ट्र शस्त्रसंपन्न आणि बलसंपन्न होऊन जाईल, त्या दिवशी ही तो गीतेच्या तत्वांचा पालन करेल. इतरांना संपवणार नाही. हिंदुत्वमध्ये असे असमतोल कधीच नव्हते. आपणच हिंदुत्वाला पूजा पद्धत, रूढी-परंपरा, खाद्यसंस्कृती यामध्ये अडकवलेलं आहे. हिंदुत्वमध्ये असे बंधन कधीच नाही", असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.
त्यांनी धर्म संसदेत कालीचरन महाराजांनी केलेल्या अतिवादी विधानाबद्दल उघड नाराजीही व्यक्त केली. हिंदुत्वाचे नावावर आज आपण त्याचा अर्थ विसरून जे काही करत आहोत, ते हिंदुत्व नाही. कुठलाही स्वार्थ आणि शत्रुत्व मनामध्ये ठेऊन जे अतिवादी विधान केले जात आहे, एक विधान नुकतच झालेल्या धर्मसंसद मधून बाहेर आले. ते हिंदू वचन हिंदू कर्म किंवा हिंदू मन मुळीच नाही असे मोहन भागवतांनी स्पष्ट केले. राग मनात ठेवून, संतुलन गमावून जर मी पण काही अतिवादी विधान करणार असेल तर ती माझी चूक असेल, तो हिंदुत्व मुळीच नाही असे सांगून त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर अतिवादी विधाने करणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.
"इंग्रजांनी भारताचे तुकडे करण्यासाठी हिंदुत्वाची हीच सर्वसमावेशक भावना लोकांच्या मनात दुसर करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ब्रिटिशांना वाटायचं की याच्यातून काही काळे अंग्रेज भविष्यात निर्माण होतील. दुर्दैवाने आजही तसेच प्रयत्न होत आहेत", अशी खंतही मोहन भागवत यांनी व्यक्त केली.
हे देखील वाचा-
- अजित पवार- हर्षवर्धन पाटील एकाच कार्यक्रमात; दोघांमधील गप्पांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आठ शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल
- Sanjay Raut : मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू केंद्र सरकार पोसतंय; संजय राऊत यांचा हल्लाबोल
LIVE TV | लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी शिवाजी पार्कवर पोहचले.