एक्स्प्लोर

Mumbai Drugs Case: वानखेडेंना अटक करण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी नोटीस देणे बंधनकारक - हायकोर्ट

Mumbai Drugs Case: क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे.

 

Mumbai Drugs Case: क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात समीर वानखेडे यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. समीर वानखेडेंविरोधात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. जर गरज पडलीच तर वानखेडेंना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी किमान तीन दिवस आधी त्यांना नोटीस देणे बंधनकारक असेल. यामुळे त्यांना कोर्टात दाद मागण्याची संधी मिळेल, असे निर्देश देत समीर वानखेडे यांनी दाखल केलेली तातडीची याचिका गुरूवारी न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने निकाली काढली. राज्य सरकार विशेष एसआयटी स्थापन करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली आपल्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे याची कुणकुण लागताच वानखेडेंनी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने हायकोर्टात धाव घेतली होती.

क्रुझ ड्रग्ज पार्टी आणि एकंदरीत समीर वानखेडे यांच्यावर जे एकापाठोपाठ आरोप होत आहेत त्या आरोपांचा तपास एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी करत असताना या समांतर चौकशीची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत याप्रकरणी आलेल्या तक्रारींचा तपास सीबीआय अथवा अन्य केंद्रीय तपासयंत्रणेकडे सुपूर्द करण्याची मागणीही वानखेडेंकडने हायकोर्टात करण्यात आली. तसेच राज्य सरकारमधील एक मंत्री आपले वैयक्तिक हेवेदावे चुकते करण्यासाठी आपल्याला जाणूनबूजून लक्ष्य करत असल्याचा आरोपही वानखेडेंनी या याचिकेतून केला. 

राज्य सरकारने मात्र वानखेडेंच्या या याचिकेला विरोध केला. एनसीबीय विभागीय संचालक समीर वानखेडेंविरोधात सध्या मुंबई पोलिसांकडे चार तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीची मुंबई पोलिसांचे वरीष्ठ अधिकारी त्याची चौकशी करत आहेत. हा तपास सध्या अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. तसेच तूर्तास मुंबई पोलिसांनी कुठेही गुन्हा नोंदवलेला नाही. त्यामुळे यावेळीला अश्याप्रकारची याचिका दाखल होऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली. मात्र, मग अश्या परिस्थितीत तुम्ही याचिकाकर्त्यांला कठोर कारवाईपासून तूर्तास वगळणार का? असा सवाल हायकोर्टाने सरकारी वकिलांना विचारला. तेव्हा तिथे उपस्थित वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिल्याने हायकोर्टाने वानखेडेंना तूर्तास कठोर कारवाईपासून दिलासा दिला आहे. 

किंगखान शाहरुखचा मुलगा आर्यन आरोपी असलेल्या क्रुझ पार्टी अमली पदार्थ प्रकरणाचा तपास समीर वानखेडे यांच्या देखरेखीखाली होत आहे. मात्र मागील गेल्या काही दिवसांपासने त्यांच्या व्यक्तिगत आणि तपासाच्या कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि या प्रकरणातील एका पंच साक्षीदाराने वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये बोगस जात प्रमाणपत्र, खंडणी, भ्रष्टाचार, आक्षेपार्ह कार्यपद्धती समावेश आहे. या आरोपांबाबत राज्य सरकारने एसआयटीची नियुक्ती करत तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या- 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: महायुतीने विधान परिषदेची एक जागा खेचली, आता 3 जागांवर आघाडी मिळवली; मविआची 2 जागांवर घोडदौड, आतापर्यंत काय काय घडलं?
महायुतीने विधान परिषदेची एक जागा खेचली, आता 3 जागांवर आघाडी मिळवली; मविआची 2 जागांवर घोडदौड, आतापर्यंत काय काय घडलं?
Arnab Cyclone: बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकलं; महाराष्ट्रालाही तडाखा बसणार; नागपूरसह पूर्व विदर्भाला अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातील 'अर्णब' चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर धडकलं; महाराष्ट्रालाही तडाखा बसणार; नागपूरसह पूर्व विदर्भाला अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्टवर ट्विस्ट; पुण्यात धडाधड बदल, नागपूर, अमरावती, छ.संभाजीनगरमध्येही चक्रावणारी आकडेवारी
Amravati MLC Election Result 2026: 'आदरणीय गुरुजन धन्यवाद, शिक्षकांनी माझी किंमत काय हे दाखवून दिले'; अमरावतीत मतदारांचा कौल बघताच भाजप अनिल बोंडेंच्या बहिणीचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत
'आदरणीय गुरुजन धन्यवाद, शिक्षकांनी माझी किंमत काय हे दाखवून दिले'; अमरावतीत मतदारांचा कौल बघताच भाजप अनिल बोंडेंच्या बहिणीचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP MLC Election Result 2026: वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
वाराणसी शिक्षक मतदारसंघात भाजपला पराभवाचा धक्का, पदवीधर मतदारसंघातही सपाचा उमेदवार आघाडीवर
Gokul Election: गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
गोकुळ चेअरमन निवडीची उत्सुकता शिगेला, महायुतीचे संचालक उपस्थित राहणार की नाहीत? नेमकं काय ठरलं?
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीची मतमोजणी शेवटच्या टप्प्यात; हर्षदा देशमुख विजयापासून 'इतक्या' मतांनी दूर, अद्याप कोणीच पूर्ण करू शकले नाही विजयी मतांचा कोटा
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Raj Thackeray: 'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
'संध्याकाळी या, कसं कंपलसरी करतात ते बघतो..' राज ठाकरे कर्जत भीमाशंकरच्या झाडांसाठी मैदानात, स्थानिकांची भेट घेत दिला शब्द
Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result : सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
सत्तारांच्या मदतीचा शरद पवार गटाला फायदा? संभाजीनगर पदवीधरमध्ये प्रतापसिंह पाटील मजबूत स्थितीत; 11 हजारांहून अधिक मते अवैध, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार, निकालाची उत्सुकता ताणली
Pune MLC Election Result : पुणे शिक्षक निकालात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सानप पिछाडीवर, विजयाची फक्त औपचारिकता बाकी, 6200 मतांचा फरक
पुणे शिक्षक निकालात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सानप पिछाडीवर, विजयाची फक्त औपचारिकता बाकी, 6200 मतांचा फरक
Arnab Cyclone Marathi News: 100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
100 रेल्वे गाड्या, 21 विमानांची उड्डाणे रद्द; 20 जिल्ह्यांना पावसाचा इशारा, अर्णब चक्रीवादळाचा हाहाकार
Embed widget