एक्स्प्लोर

Bal Bothe Arrested | अटककेवेळी बाळ बोठे यांच्या खिशात सापडली सुसाईड नोट, पोलिसांची माहिती

रेखा जरे आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करतील या कारणातून हत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मात्र हत्ये मागचं नेमकं कारण काय आहे? याचा तपास आता पोलीस करत आहे. तसेच अटकेवेळी बाठ बोठे यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती.

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेला आरोपी बाळ बोठे याला अहमदनगरच्या पोलिसांनी जेरबंद करण्यात आलं. बाळ बोठे यांना हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. बाळे बोठे ज्या रूममध्ये थांबला होता त्या रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते, अशी माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच बाळ बोठे यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती. त्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख होता. तसेच त्यांचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कोणाला संपर्क करावा, यासंदर्भातील माहिती सुसाईड नोटमध्ये देण्यात आली होती, असंही अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. 

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर सुपा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. या आरोपींकडे चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे यांनी सुपारी देऊन ही हत्या केल्याची माहिती पुढे आली. बाळ बोठेला अटक करण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तैनात करू विविध जिल्ह्यांमध्ये छापे देखील टाकले. मात्र बाळ बोठे यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले. 

बाळ बोठेला जेरबंद करण्यासाठी 5 दिवसांचं विशेष ऑपरेशन

अखेर हैदराबाद येथे बाळ बोठे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी बाळ बोठे यांना हैदराबाद येथील एका हॉटेलमधून अटक केली. इतकेच नाही तर बाळ बोठे यांना मदत करणाऱ्या इतर पाच जणांना देखील पोलिसांनी जेरबंद केले. विशेष म्हणजे ज्या रूम मध्ये बाळ बोठे होते त्या रुमाल बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. मात्र तरी देखील पोलिसांनी बाळ बोठे यांना जेरबंद केलं आहे. या अटकेसाठी पोलिसांनी 5 दिवस विशेष ऑपरेशन केले. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. तब्बल 102 दिवसानंतर पोलिसांनी बाळ बोठेला अटक केलीय.

रेखा जरे हत्याकांड घटनाक्रम 

- 30 नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर जातेगाव फाटाजवळ रेखा जरे यांची निर्घृण हत्या करण्यात आली.  त्यानंतर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- अवघ्या 18 तासात फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे आणि आदित्य चोळके यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर 24 तासात सर्व 5 आरोपींना अटक केले.
- बाळ बोठे यांना सुपारी दिल्याची कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली. 
- बाळ बोठे यांना अटक करण्यासाठी 5 पोलिसांची पथके तैनात करण्यात आली. 
- नाशिक, पुणे, सोलापूर अशा विविध जिल्ह्यात पोलीसांनी छापे टाकले. मात्र बाळ बोठे यांना पकडण्यात अपयश आलं.  
- 8 डिसेंबर रोजी बाळ बोठे यांच्या जामिनासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल.  
- 16 डिसेंबर रोजी बाळ बोठे यांचा अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात जमीन अर्ज फेटाळला. 
- त्यांनतर औरंगाबाद उच्च न्यायालयाने देखील जमीन अर्ज फेटाळला.
- 26 फेब्रुवारी रोजी 5 आरोपींविरोधात दोषारोपपत्र पारनेर न्यायालयात दाखल करण्यात आले. 
- 5 मार्च रोजी रेखा जरे याच्या मुलाचे पोलिस अधीक्षक कार्यासमोर 1 दिवसीय उपोषण केलं. 
- अखेर 102 दिवसांनंतर बाळ बोठे यांना एका हॉटेलमधून घेतले ताब्यात. त्यासोबत त्याला मदत करणाऱ्या 5 जणांना देखील अटक झाली. 
- रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांच्यासह 11 आरोपी अटकेत आहेत.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget