एक्स्प्लोर
राज्यात 4 हजार 738 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार
राज्यातील विद्यापीठं आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं.

मुंबई : राज्यातील 4 हजार 738 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारतर्फे ही भरती केली जाणार असून, आता महाविद्यालयांना सदरील जागा भरण्याची अनुमती मिळणार आहे. तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचंही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलं. विनोद तावडेंनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. राज्यातील विद्यापीठं आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्ष पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत होतं. या पार्श्वभूमीवर केवळ तासिका तत्त्वावर अध्यापक भरती न करता आता थेट अध्यापक भरती करण्यात येणार आहे.
अध्यापकांच्या 3580 जागा, शारीरिक शिक्षण संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा अशी एकूण 4738 पदे येत्या काळात भरण्यात येणार आहेत.Recruitment orders for 4738 teaching and non teaching positions have been approved for senior colleges across the state. Furthermore, the remuneration for the teachers on clock hour basis, has been doubled per the newly issued directive.
— Vinod Tawde (@TawdeVinod) November 2, 2018
आणखी वाचा























