मुंबई : माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा असतानाच भाजपसमोर बंडखोरांचं आव्हान उभं राहिल्याचं म्हटलं आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्या संपर्कात असून वेगळा विचार करण्यासाठी या दोन्ही नेत्यांवर बंडखोरांचा दबाव असल्याचं कळतं. दरम्यान हे सर्व पराभूत बंडखोर आहेत. मात्र त्यांना 30 हजार ते 90 हजारांपर्यंत मतं मिळाली आहेत.


भाजपने तिकीट डावललं तरी मोठा संघर्ष करुन, बंडखोरी करुन त्यांनी निवडणूक लढवली. मोठं मताधिक्य मिळालं, परंतु विरोधात बसावं लागल्याने बंडखोर अस्वस्थ आहेत. महाविकासआघाडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसण्याची भीती त्यांना आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकीसाठी वेगळी समीकरणं दिसण्याची शक्यता आहे.

11 ते 12 भाजपचे बंडखोर उमेदार विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या दोघांनाही पक्षाने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे बंडखोर तावडे आणि खडसेंच्या संपर्कात असण्यामागे 2014 च्या आधीच्या निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. या दोघांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलं होतं. तिकीट वाटपामध्ये दोन्ही नेते महत्त्वाची भूमिका निभावायचे. परंतु यंदाच्या निवडणुकीत दोघांनाही डावललं आणि आयातांना संधी दिली. त्यामुळे कोणाशी संपर्क करावा अशी मनस्थिती बंडखोरांची होती. त्यामुळे त्यांनी खडसे आणि तावडेंना संपर्क केला.

आता एकनाथ खडसे आणि विनोद तावडे बंडखोरांची समजूत कशी काढणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे. परंतु या बंडखोरांमध्ये भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

भाजप बंडखोर आणि त्यांना मिळालेली मतं :-

बुलडाणा - योगेंद्र गोडे - 29943

दर्यापूर - सीमा सावळे - 18429

देवळी - राजू बकाने - 39541

तुमसर - चरण वाघमारे - 79490  (भाजपच्या अधिकृत उमेदवाराला मिळाली होती 33457 मतं,  राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे 87190 मतं मिळवत 7700 मतांनी विजयी)

नांदेड दक्षिण - दिलीप कंडकुरते - 43357 (शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मिळाली होती 37066 मतं, काँग्रेस उमेदवाराला मिळाली 46943 मतं, काँग्रेस फक्त 3592 मतांनी विजयी)

बसमत - शिवाजी जाधव - 67070  (शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला मिळाली होती 41557 मतं,  राष्ट्रवादीचे राजूभय्या नवघरे 75321 मतं मिळवत 8251 मतांनी विजयी)

बोईसर - संतोष जनाथे -30952 (शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विलास तरे यांना मिळाली होती 75951 मतं,  बविआचे राजेश पाटील 78703 मतं मिळवत फक्त 2752 मतांनी विजयी)

कल्याण पश्चिम - नरेंद्र पवार - 43209

अहमदपूर - दिलीप देशमुख - 45846 (भाजपच्या अधिकृत उमेदवाराला 55445 मतं मिळाली होती, राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील 84636 मतं मिळवत 29191 मतांनी विजयी)

पंढरपूर - समाधान अवताडे - 54124  (भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर परिचारक यांना 76426 मतं मिळाली होती, राष्ट्रवादीचे भारत भालके 89787 मतं मिळवत 13361 मतांनी विजयी)

कागल - शमरजित सिंग घाटगे - 88303 (शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय घाटगे यांना 55657 मतं मिळाली होती, राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ 1 लाख 16 हजार 436 मतं मिळवत फक्त 28 हजार 133 मतांनी विजयी)

इस्लामपूर - निशिकांत भोसले - 43394

संबंधित बातम्या

Special Report | एकनाथ खडसेंना दूर ठेऊन भाजपने चूक केली? | ABP Majha



Eknath Khadse | सिंचन घोटाळ्यांचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले : एकनाथ खडसे | ABP Majha