स्मार्ट बुलेटिन | 03 डिसेंबर 2019 | मंगळवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम | 03 Dec 2019 08:18 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. पंतप्रधान मोदींनी एकत्र काम करण्याची ऑफर दिल्याचा शरद पवारांचा गौप्यस्फोट, 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांच्या बंडाचंही गुपित उलगडलं 2. देवेंद्र फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्राने नाकारलं; माझाच्या मुलाखतीत शरद पवारांची बोचरी टीका 3. उद्धव ठाकरे सरकारचं खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता, उपमुख्यमंत्रीपदाबाबत मात्र सस्पेन्स कायम 4. बुलेट ट्रेन मुख्यमंत्री ठाकरेंच्या रडारवर, प्रकल्पांचं प्राधान्य ठरवणार असल्याचं वक्तव्य, तर आता बुलेट ट्रेनची गरज आहे का? शरद पवारांचा सवाल 5. नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश, आरे वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हेही रद्द 6. मुंबई महापालिकेची रुग्णालये रात्री अकरापर्यंत सुरु राहणार, खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून 15 दवाखान्यांमध्ये उपचार सुविधा 7. येत्या तीन दिवसात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरला धोका, हवामान विभागाचा अंदाज 8. डोक्यावरुन पाणी चाललंय, हे थांबवलं पाहिजे, हैदराबाद बलात्कार प्रकरणावर क्रिकेटपटू विराट कोहलीचा संताप, तर नराधमांना ठेचून मारा, खासदार जया बच्चन यांची राज्यसभेत मागणी 9. वोडाफोन-आयडियासह एअरटेलच्या शुल्कात आजपासून 50 टक्के वाढ, तर सहा डिसेंबरपासून जिओचे दर 40 टक्क्यांनी वाढणार, ग्राहकांमध्ये नाराजी 10. क्रिकेटपटू मनीष पांडे लग्नाच्या बेडीत, दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीसोबत बोहल्यावर, मुंबईत ग्रॅण्ड विवाहसोहळा