भाजपचे भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ज्या 19 बंगल्यांचा टॅक्स रश्मी ठाकरे भरतायत, तेच चोरी कसे गेले, असा सवाल केलाय. तर रश्मी ठाकरेंच्या 19 बंगल्याचे वास्तव काय? किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे की खोटे याबाबत माहिती ABP माझाच्या हाती लागली आहे, कोर्लई गावच्या सरपंचांनी याबाबत ABP माझाला माहिती दिलीय.
सोमय्यांचा आरोप
अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.
कोर्लई गावच्या सरपंचानी abp माझाला माहिती दिलीय
सरपंच मिसाळ यांनी माहिती दिली, कोलई गावात बंगले होते कि नव्हते? प्रत्यक्षात 19 बंगले नव्हते, 18 बंगले होते, अन्वय नाईक यांनी घेतलेल्या जागेवर 18 बंगले होते. खरेदी केल्यानंतर अन्वय नाईक यांनी ती घरं पाडली. घरं पाडून रश्मी ठाकरे, मनिषा वायकरांनी विकली. पूर्वी बंगले असल्यानं ठाकरे यांनी घरपट्टी भरली,. रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतीची कधीही माफी मागितली नाही. अशी माहिती कोर्लई गावच्या सरपंचानी abp माझाला माहिती दिलीय. सरपंचांनी सोमय्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे
सोमय्यांचा दावा फेटाळला
सोमय्या म्हणाले होते, संजय राऊत यांना माझा जोडा द्यायला तयार आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वयकर यांनी जर टॅक्स भरला नाही असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा असेही सोमय्या यावेळी म्हणाले. संजय राऊत यांनी माझ्याबाबत काही आरोप केले आहेत, माझी खुशाल चौकशी करा असे सोमय्या यावेळी म्हणाले. 19 बंगल्यावर घेऊन जातो, बंगले नाही दिसले तर जोडे मारतो असं ते म्हणाले, पण नेमकं कोणाला जोडे मारायचे आहेत असेही सोमय्या म्हणाले. 2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. घरं नाही तर घरपट्टी का भरतात? किरीट सोमय्यांना कशाला, रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनिषा वायकर यांना तिथे घेऊन जा असे किरीट सोमय्या म्हणाले. यावेळी किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 ला कर भरला, त्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता असा प्रश्न देखील सोमय्या यांनी संजय राऊत यांना केला. त्यावर आज कोर्लई गावचे सरपंच मिसाळ यांनी ही माहिती देत सोमय्यांचा दावा फेटाळून लावला आहे,
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Kirit Somaiya : बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? किरीट सोमय्यांचा सवाल
- Kirit Somaiya Press Conference : निकॉन कंपनीशी निल सोमय्यांचा संबंध आहे की, नाही? किरीट सोमय्या म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha