एक्स्प्लोर
रत्नागिरीत सागरी सुरक्षेचे तीनतेरा, 9 स्पीड बोटींपैकी 4 बंद
रत्नागिरीतील परिस्थिती पाहिल्यानंतर सागरी सुरक्षेबाबत तडजोड आणि खेळ तर केला जात नाहीय ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रत्नागिरी : मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर समुद्रातील गस्त वाढवण्यात आली. पण, सद्यस्थितीत सागरी सुरक्षेबाबत सरकार गंभीर आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण रत्नागिरी पोलिसांना सागरी गस्त घालण्यासाठी देण्यात आलेल्या स्पीड बोटी दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असून त्या झाकून ठेवण्यात आल्या आहेत.
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता समुद्रातील गस्तीसाठी नऊ स्पीड बोट पोलिसांना देण्यात आल्या. पण, त्यापैकी चार बोटी बंद अवस्थेत आहेत. तर, दोन बोटी भाड्याने घेण्यात आल्या आहेत. पोलिसांना 25 नॉटिकल मैलपर्यंत गस्त घालावी लागते. पण, अपुऱ्या बोटींमुळे त्यावर देखील बंधन येत आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे बंद बोटींची दुरुस्ती परिवहन विभागाकडे देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेशी खेळ का? स्पीड बोटी दुरुस्ती करण्याचा परिवहन विभागाला अनुभव आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या साऱ्या बाबींवर पोलीस अधीक्षकांनी बोलणं टाळलं असलं तरी पालकमंत्री अनिल परब यांनी मात्र वेळ मारुन नेली. "दुरुस्तीसाठी वारंवार येणारा खर्च जास्त असेल तर मला असं वाटतं की नवीन बोटी घेण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला द्यावा," असं अनिल परब म्हणाले.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याला 167 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. तर, 421 किमी हा खाडीचा समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारी 11 बंदरे असून 10 सागरी पोलीस ठाणी आहेत. तर, 125 लहान मोठ्या जेटी आहेत. शिवाय, लँडिंग पॉईंटचा विचार करता स्पीड बोटींची अवस्था म्हणजे सुरक्षेची तडजोड का? हा प्रश्न आहे. तसंच या साऱ्या परिस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय? असा देखील प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, बोटींचा स्पीड आणि अपुरी जागा यामुळे देखील काही बंधन येत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement