एक्स्प्लोर

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनची नवी तारीख जाहीर; वाचा काय सुरु, काय बंद?

कोरोना साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केली आहे. 2 जूनच्या मध्यरात्रीपासून अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे. 2 जूनच्या मध्यरात्रीपासून अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, यापूर्वी 2 जून ते 8 जून अशी लॉकडाऊनची तारीख होती. पण, लोकांना वेळ मिळावा, कुठंही गोंधळ होऊ नये या दृष्टीनं 3 ते 9 जूनच्या कालावधीत जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. यावेळी जिल्हावासियांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

या कालावधीमध्ये सर्व प्रकारची दुकानं आणि आस्थापनं बंद राहणार असून केवळ 11 वाजेपर्यंत दुधाच्या होम डिलिव्हरीचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून जिल्हा प्रवेशासाठी ई पास अनिवार्य करण्यात आलेला आहे. शिवाय, एसटी, सरकारी आणि खासगी वाहतूक देखील या कालावधीमध्ये बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी एसटी सेवा सुरू राहिल. तर, शेतकऱ्यांकरता आणि शेती संबंधित कामकाजाकरता बँका आणि वित्तीयसंस्था यांचं कामकाज 2 वाजेपर्यंत सुरू राहणार असून यावेळी केवळ 10 टक्के कर्मतारी हजर राहतील. तर पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार असून हायवेवरील पंप मात्र 24 तास मालवाहतुकीसाठी सुरू राहतील. 

लग्न, समारंभांवर आता करडी नजर
दरम्यान, आता जिल्ह्यातील लग्न समारंभांवेळी नियमांचं उल्लंघन होत असल्याचं समोर आल्यानंतर त्यावर आता लक्ष ठेवले जाणार आहे. लग्नाच्या ठिकाणी एक कॉन्स्टेबल, व्हिडीओग्राफर आणि तलाठी हजर राहून यावर नजर ठेवतील. यावेळी केवळ 25 जणांच्या उपस्थितीला मान्यता असून सर्वांना अँन्टिजेन चाचणी बंधनकारक असणार आहेत. 

..तर मेडिकल दुकानांना 10 हजारांचा दंड
काही मेडिकल दुकानांमध्ये औषधांशिवाय इतर सामान देखील विकल्याचं निदर्शनास आलं आहे. अशा प्रकारे कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांना 10 हजारांचा दंड ठोठावला जाणार आहे. 

3 जून ते 9 जून दरम्यान खालील महत्त्वाचे नियम असणार लागू 

  • सर्व प्रकारची दुकानं बंद, केवळ दुधाची 11 वाजेपर्यंत होम डिलिव्हरी होणार
  • जिल्ह्याच्या सीमा बंद; प्रवेशासाठी आरटीपीसीआर टेस्ट अनिवार्य
  • जिल्ह्यात प्रवेशासाठी आता ई पास अनिवार्य
  • सर्व प्रकारची खासगी, सरकारी वाहतूक बंद
  • अत्यावश्यक सेवेसाठी केवळ एसटी सुरू राहणार
  • बँक आणि वित्तीय संस्था कामकाज शेतकऱ्यांचा विचार करता सुरू राहणार; केवळ 10 टक्के उपस्थिती राहणार
  • बँक, वित्तीय संस्था 2 वाजेपर्यंत सुरू राहणार; वित्तीय संस्थांमध्ये केवळ शेतकऱ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार सुरू राहणार
  • एमआयडीसीमधील अत्यावश्यक सेवेत नसेलेले उद्योग बंद राहणार
  • सर्व खासगी कार्यालयं बंद, शासकीय कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती; केवळ अत्यावश्यक सेवेतील सरकारी कार्यालयं 15 टक्के उपस्थितीसह राहणार सुरू
  • जिल्ह्यातील पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार; मालवाहतुकीसाठी हायवेवरील पेट्रोल पंप मात्र 24 तास सुरू राहणार
  • बियाणं, खते, किटकनाशके यांची दुकानं ठराविक वेळेमध्ये सुरू राहणार
  • हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार बंद; होम डिलिव्हरी देखील बंद
  • हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या होम डिलिव्हरीबाबत काही दिवसानंतर निर्णय
  • चिकन, मटन, मच्छिची, दुकानं बंद  
  • मेडिकल दुकानांमध्ये इतर सामानाची विक्री झाल्यास 10 हजारांचा दंड
  • लग्नाच्या ठिकाणी कॉन्स्टेबल, तलाठी आणि व्हिडीओग्राफर असणार; केवळ 25 जणांची उपस्थिती तर अँन्टिजेन टेस्ट अनिवार्य
  • रेल्वेनं येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्टेशन्सवर कोरोना चाचणी होणार
  • शासकीय बांधकामं वगळता इतर सर्व प्रकारचे कामकाज बंद राहणार
  • लसीकरण सुरू राहणार; त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
मोठी बातमी : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget