एक्स्प्लोर

'आरजीपीपीएल'साठी भास्कर जाधवांचे शरद पवारांना साकडे; पवारांनी दिलं हे आश्वासन

रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्ट कंपनीमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार टिकून राहावा यासाठी लवकरच दिल्लीमध्ये पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे शरद पवारांनी आश्वासन दिले.

रत्नागिरी : गुहागर तालुक्यात असलेल्या रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रोजेक्ट या कंपनीमधील कर्मचाऱ्यांचा रोजगार टिकून राहावा यासाठी प्रयत्न करणारे आमदार भास्कर जाधव हे अडचणीत आलेला हा प्रकल्प चालू राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी याप्रश्नी लवकरच दिल्लीमध्ये पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. 
 
रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट हा 1967 मेगावॅट क्षमता असलेला गॅसवर आधारित भारतातील सर्वात मोठा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे सुमारे १ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.परंतु, गॅसची वाढलेली किंमत आणि पर्यायाने निर्माण होणाऱ्या विजेचा दरही जास्त असल्याने वीज खरेदी करण्यासाठी कोणी पुढे येत नाही.त्यामुळे हा प्रकल्प सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. 
 
रत्नागिरी गॅस अँड पावर प्रोजेक्टचा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीसोबत सन 2032 पर्यंत वीज खरेदीचा करार असताना महावितरणने सन 2014 पासून वीज खरेदी थांबवली आहे तर दुसरीकडे भारतीय रेल्वेला सुरू असलेला 540 मेगावॅट वीज पुरवठाही थांबला आहे. परिणामी हा प्रकल्प सद्यस्थितीत खूपच अडचणीत आला आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण झाला आहे. 
 
कंपनीतील कर्मचार्‍यांचा रोजगार टिकून राहावी यासाठी आमदार जाधव सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु त्याचबरोबर प्रकल्पही सुरू राहिला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते मुंबईत अनेकांना भेटले. त्यात आज खासदार शरद पवार यांचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंथा, कंपनीचे सल्लागार हिरानंद हरचंदानी, सहाय्यक व्यवस्थापक सबरी गिरीश एन हेदेखील उपस्थित होते. 
 
कंपनीकडे वेगवेगळ्या राज्यातून विजेची मागणी आहे परंतु वीज निर्मितीसाठी आवश्यक असलेला गॅस कमी किंमतीत उपलब्ध होत नाही.कंपनीचे अधिकारी त्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करीत आहेत.मात्र त्यात त्यांना यश येत नाही, ही बाब आमदार भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्याकडे मांडली आणि यावर मार्ग काढण्याची विनंती केली.शरद पवार यांनी हा संपूर्ण विषय अत्यंत गांभीर्याने समजून घेतला आणि आमदार भास्कर जाधव, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना लवकरच दिल्लीमध्ये बोलावून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. 
 
महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget