रत्नागिरी : जिल्ह्यातील मंडणगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनीच आपल्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मंडणगड तालुक्यामध्ये बाणकोट गावाचा रहिवाशी असलेला आरोपी ईलियास खेडेकर याने स्वतःच्या चार वर्षांच्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याने त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथे ही घटना घडली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील आरोपी ईलियास खेडेकर हा आपल्या कुटुंबियासोबत राहतो.आरोपी ईलीयास खेडेकरला चार वर्षाची एक मुलगी आहे. आरोपी ईलीयास खेडेकर याने चार दिवसांपूर्वी त्याच्या चार वर्षाच्या चिमुकलीला काही किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केली. यावेळी मुलीला बेदम मारहाण करून तिला भिंतीवर ढकलून दिले असता तिचे डोके भिंतीवर आपटले.
या चिमुकलीला उपचारासाठी प्रथम डेरवण येथे नेण्यात आले असता गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी, 1 जानेवारीला पहाटेच्या सुमारास रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान तिचे दुःखद निधन झालं आहे.
या प्रकरणी बाणकोट सागरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ईलियास खेडेकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने बाणकोट गावात हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :