Child vaccination : तीन जानेवारीपासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, रत्नागिरी येथे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एका मुलाला एकाच दिवसांत दोन डोस देण्यात आले आहेत. चिपळूण तालुक्यातील दुर्गवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरणावेळी ही धक्कादायक घटना घडली आहे. 


दुर्गवाडी येथे 15 वर्षीय विद्यार्थीला 15 मिनिटांच्या अंतराने दोन डोस दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पंधरा मिनिटांच्या अंतरात चक्क दोन डोस देण्याची करामत आरोग्य कर्मचारी यांनी केली. 15 मिनिटांच्या अंतराने दोन डोस घेतलेल्या विद्यार्थीला कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा मुलगा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना विचारले असता हास्यस्पद उत्तर देण्यात आलं. मुलाला दोन डोस दिल्याची घटना चुकून झाल्याचं आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितलेय.  


मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह राज्याच्या विविध भागात लसीकरण सुरु झालंय. मुंबईत जवळपास नऊ लाख मुलांना लस दिली जाणार आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही मुलांच्या लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. CoWIN पोर्टलवर आपला COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. 


मुलांच्या लसीकरणासाठी स्लॉट कसा बुक कराल? (How To Book COVID-19 Vaccine Slot For Children)


लहान मुलांसाठी  COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी फारसं काही नवीन करण्याची गरज नाही. यापूर्वी लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची जी प्रक्रिया होती तिच फॉलो करावी लागणार आहे. वॅक्सिनचा स्लॉट रजिस्टर करण्यासाठी CoWIN पोर्टल (cowin.gov.in) वर लॉगइन करा. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन रजिस्ट्रेशन करा. विद्यार्थी शाळेच्या आयकार्डचा वापरही करु शकतात. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी 3 जानेवरी, 2022 पासून लसीकरणासाठी सेंटर शोधू शकतील. तसेच अपॉइंटमेंट बुक करु शकतील. पोर्टलवर राज्य, जिल्हा किंवा शहरानुसार जवळचं लसीकरण केंद्र उपलब्ध होईल. त्यासोबतच पोर्टलवर Google मॅपवर जवळचं लसीकरण केंद्र शोधता येईल. 


संबधित बातम्या : 


गोंदियात एकाच दिवशी महिलेला कोविशिल्डचे दोन डोस? जालन्यात महिलेला दोन वेगवेगळ्या लशींचे डोस


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live