रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दहा ते बारा दिवसांपूर्वी अॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या शून्य असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता 52 झाला आहे. कारण मागच्या 10 दिवसांमध्ये तब्बल 45 कोरोनाचे रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात नव्याने आढळून आले आहेत. जिल्ह्याचा विचार करता मुंबई आणि पुणे या ठिकाणांहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यानुसार कोरोना बाधितांचा आकडा देखील वाढता आहे. मागील 10 ते 12 दिवसांमध्ये तब्बल 46 कोरोनाचे रुग्ण नव्यानं आढळून आले आहेत. यातील जवळपास 42 रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. तर, 2 नर्सिंगच्या विद्यार्थिनींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात यापूर्वीच 5 रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुक्तीकडे होणारा प्रवास आणि कोरोनाची वाढती संख्या
रत्नागिरी जिल्ह्याचा प्रवास आता कोरोनामुक्त जिल्ह्याकडून कोरोनायुक्त जिल्ह्याकडे सुरु झाल्याचे चित्र आता दिसत आहे. त्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडू लागली आहे. मागच्या दहा दिवसामध्ये तब्बल 45 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 43 जण हे मुंबई रिटर्न आहेत. तर, रत्नागिरी जिल्हा रूग्णालयातील दोन नर्सना देखील कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय, मुंबई, पुणे तसेच जिल्हाबाहेरून येणाऱ्या गाड्यांची संख्या देखील आता लक्षणीय असल्यानं त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईहून आलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चाकरमान्यांना गावी घेण्याबाबत देखील आता उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यात 19 मार्च रोजी दुबईहून आलेल्या 50 वर्षीय व्यक्तिला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर कोरोनाचा दुसरा रुग्ण 3 मार्च रोजी राजीवडा येथे आढळून आला. सदर व्यक्ती ही दिल्लीतील मरकजला गेल्याचे स्पष्ट झाले होते. 18 मार्च रोजी ही व्यक्ति रत्नागिरीत आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीवडा हा परिसर तीन किमीपर्यंत सील करण्यात आला. या साऱ्या घडामोडी घडत असताना 7 मार्च रोजी रत्नागिरीपासून जवळच असलेल्या साखरतर गावात 50 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिच्याच घरातील आणखी एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या साऱ्या घडामोडी घडत असतना रत्नागिरी जिल्ह्याच्या चिंतेत आणखी भर पडली ती सहा महिन्याच्या बाळाला झालेल्या कोरोनामुळे. साखरतर येथील महिलेच्या संपर्कात आल्याने तिच्याच नातवाला कोरोना झाल्याचे 14 एप्रिल रोजी आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली. पण, बाळाची तब्येत मात्र उत्तम होती. स्पेशल वॉर्ड तयार करत बाळावर उपचार केले गेले.
8 एप्रिल रोजी रत्नागिरीतील खेड येथे कोरोनाबाधित व्यक्तिचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली. दुबईहून आलेल्या या व्यक्तिला कळंबणी येथे दाखल करण्यात आले होते. पण, त्याला कोरोना असल्याचे त्याच्या मृत्यूनंतर समोर आले. या साऱ्याबाबींमध्ये समाधानाची बाब होती ती म्हणजे या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या 18 जणांचे कोरोना रिपोर्ट हे निगेटीव्ह आले. शिवाय, 10 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला दिला गेलेला डिस्जार्च. त्यानंतर मात्र जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. अखेर 26 मार्च रोजी जिल्हा रूग्णालयातील सहा महिन्याच्या बाळासह आणखी दोघांना डिस्जार्ज देण्यात आला. त्यानंतर पुढील 8 दिवस एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा रंगली. पण, 2 मे रोजी चिपळूण आणि संगमेश्मवरमध्ये कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळून आले. मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र रोज मंडणगड, दापोली, चिपळूण, मंगमेश्वर, खेड, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मागच्या 10 ते 12 दिवसामध्ये तब्बल 45 जणांना कोरोनाची लागण झाली असून पैकी 43 जण हे मुंबई रिटर्न आहेत. जिल्ह्याचा विचार करता आता केवळ राजापूर तालुक्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेले नाही. पण, आता चाकरमान्यांना गावी घेण्यावरून मात्र उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
संबंधित बातम्या :
सार्वजनिक ठिकाणी मुडदे पडू नयेत म्हणून राज्यकर्त्यांनी 'कोरोना'चे भजन थांबवायला हवे : सामना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे 143 कोटींची संपत्ती
भाजपने तिकीट नाकारल्यानंतर सहाव्या जागेसाठी काँग्रेसची ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
मद्यप्रेमींसाठी खुशखबर; ई-टोकनद्वारे दारुची विक्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाची सुविधा
मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे