देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोदींचा चौथ्या लॉकडाऊनचा इशारा, संसर्ग रोखून सार्वजनिक गतिविधी वाढवण्याचं मोठ आव्हान, 15 मेपूर्वी राज्यांना आराखडा सादर करण्याचे आदेश

Continues below advertisement

2. अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरु करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी, रखडलेल्या कर्जमाफीसाठी आरबीआयला सूचना देण्याचीही विनंती

3. देशभरातून आज सुटणाऱ्या 15 विशेष ट्रेन्सचं बुकिंग काही तासांतच फुल, अनेक ट्रेन्सना महाराष्ट्रातील प्रमुख स्थानकांवर थांबा, रेल्वे स्थानकांवर गर्दी टाळा एबीपी माझाचं आवाहन

Continues below advertisement

4. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 67 हजार 152 वर, तर आतापर्यंत 20,917 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त, देशातील रिकव्हरी रेट 31.15 टक्क्यांवर

5. राज्यात गेल्या 24 तासांत 1230 कोरोनाचे नवे रुग्ण, तर 36 जणांचा मृत्यू, सलग सहाव्या दिवशी हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 मे 2020 | मंगळवार | ABP Majha

6. जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, 212 देशांत 42 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त तर 2 लाख 87 हजार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

7. एसटीच्या सतत बदलणाऱ्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम, परळ-नालासोपाऱ्या तोबा गर्दी, टप्याटप्याने सेवा सुरु करण्याचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन

8. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याकडे 143 कोटी 27 लाखांची संपत्ती, उमेदवारी अर्जातील प्रतिज्ञापत्रात माहिती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून विधानपरिषदेचे अर्ज दाखल

9. दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ट्रेन, राज्यात चार स्थानकांवर थांबा, एकूण 1400 विद्यार्थ्यांच्या प्रवासाला परवानगी

10. मद्यप्रेमींसाठी खुशखबर; ई-टोकनद्वारे दारुची विक्री, वाईन शॉप बाहेर होणाऱ्या गर्दीपासून सुटका व्हावी म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाची सुविधा