एक्स्प्लोर

नागपुरात खंडणीखोरांचा हैदोस, हातात तलवार घेऊन राडा

गुंड हातात तलवारी घेऊन ग्राहकांनी भरलेल्या हॉटेलमध्ये धुमाकूळ घालून दहशत निर्माण करत आहेत. नागपुरातील महाअन्नपूर्णा हॉटेलमधील हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

नागपूर : क्राईम सिटी अशी ओळख बनत असलेल्या नागपुरात खंडणीखोरांची दहशत माजली आहे. गुंड हातात तलवारी घेऊन ग्राहकांनी भरलेल्या हॉटेलमध्ये धुमाकूळ घालून दहशत निर्माण करत आहेत. नागपुरातील महाअन्नपूर्णा हॉटेलमधील हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाअन्नपूर्णा हॉटेलमध्ये 17 एप्रिलच्या रात्री भरपूर गर्दी होती. लोक स्नॅक्सचा आनंद लूटत असताना रात्री 10 वाजताच्या सुमारास सात ते आठ गुंडांनी हॉटेलसमोर येऊन शिवीगाळ आणि धमकावणं सुरु केलं. ग्राहकांना काही कळायच्या आधीच गुंडांनी हॉटेलच्या काऊंटरवर बसलेल्या मॅनेजरच्या दिशेने सशस्त्र हल्ला केला. गुंडांच्या हातात तलवारी होत्या, या हल्ल्यामुळे हॉटेलमध्ये पळापळ झाली. महिलांनी कसाबसा लहान मुलं आणि स्वतःचा जीव वाचवला. काऊंटरवर बसलेल्या मॅनेजरने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हल्लेखोर गुंडाच्या दिशेने कढई फेकून मारली. त्यानंतर गुंड तिथून पळून गेले. हल्ल्याची ही दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून हॉटेलचा एक कर्मचारी या हल्ल्यात जखमी झाला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणात बेकायदेशीररित्या मंडळी जमवून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हत्या, मारामारी आणि खंडणी असे गुन्हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील गुन्हेगारी हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे नागपूरकर दहशतीखाली जीवन जगत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Jain Muni Nileshchandra on Raj Thackeray: तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य
तुमच्या स्टाईलमध्येच त्यांचा इलाज करा; जैन मुनी निलेशचंद्रांंची आता थेट राज ठाकरेंना साद; मराठी-गुजराती वादावर मोठं वक्तव्य
Ketan agrawal: लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
लोहगड केतन अग्रवाल प्रकरणात उज्ज्वल निकमांची एंट्री; सिया-चेतनच्या अडचणीत वाढ, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
Abhimanyu Pawar On Medha kulkarni: खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...
खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही...

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Who is IB Chief Mahesh Dixit: जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
जगाला धडकी भरवणाऱ्या IB ला नवा बाॅस मिळाला; दहशतवादविरोधी आणि गुप्तचर कारवायांचा अनुभव, कोण आहेत महेश दीक्षित?
Narendra Patil : ...तितक्यात ताई उठल्या आणि कॉन्ट्राव्हर्सी झाली, अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी घटनाक्रम सांगितला..
अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात मंचावर नेमकं काय घडलं? नरेंद्र पाटील यांनी सर्व घटनाक्रम सांगितला..
Ketan Agarwal Death Case :
"केतनच्या मृत्यूनंतर सियाने घरी काय सांगितलं? हावभाव कसे होते?", गुपितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी भावाला बोलवलं, काय-काय दिली माहिती?
Kolhapur Football : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल वेडं शहर, कोल्हापूरच्या फुटबॉलचा विषय हार्ड; इतिहास काय? 
Medha Kulkarni: जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
जातीवरुन वाद, खासदार मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी; म्हणाल्या, अभिमन्यू पवार स्वतःला Superior समजतात
Embed widget