Ranjitsinh Disale Latest Update : ग्लोबल टीचर अवार्ड विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) हे अखेर फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी अमेरिकेला रवाना झाले. आज पहाटे ते मुंबईहून अमेरिकेच्या दिशेने रवाना झाले. काही महिन्यापूर्वी रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारची प्रतिष्ठीत फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. या स्कॉलरशिपद्वारे ते सहा महिने अमेरिकेत राहून संशोधन करणार आहेत.
स्कॉलरशिप जाहीर झाल्यानंतर डिसले यांनी शैक्षणिक रजा मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी शिक्षण विभागाकडून मोठा त्रास देखील त्यांना सहन करावा लागला. अखेर तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या मध्यस्तीनंतर डिसले यांची शैक्षणिक रजा मंजूर झाली. मात्र दुसरीकडे डिसले यांची चौकशी सुरुच होती. रणजितसिंह डिसले हे आपल्या प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी गैरहजर होते असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या सर्व त्रासाला कंटाळून जुलै 2022 मध्ये डिसले यांनी आपल्या उपशिक्षक पदाचा राजीनामा देखील दिलेला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. यानंतर 2 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या आरोप, चौकशी इत्यादीच्या फेऱ्यानंतर रणजितसिंह डिसले अखेर अमेरिकेला रवाना झाले आहेत. या दौऱ्यापूर्वी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील भेट घेतली. नाविन्यपूर्ण काम करत रहा अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुभेच्छा दिल्याची माहिती डिसले यांनी ट्विटरद्वारे दिली.
- 2009 साली सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून रुजू
- सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत प्राथमीक शिक्षक म्हणून कार्य
- 2017 साली सोलापुरातील वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्ती
- जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्रात IT विषय सहाय्यक म्हणून नेमणूक
- तंत्रस्नेही अशी ओळख असलेल्या डिसले विद्यार्थ्यांना व्हर्च्यूअल विज्ञान प्रयोग शिकवले
QR कोडेड पाठयपुस्तकाची संकल्पना मांडली
लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम
कार्याची दखल घेत त्यांना 4 डिसेंबर 2020 रोजी ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
त्यांच्या कार्याची दखल घेत 4 डिसेंबर 2021 मध्ये वशिंग्टन डीसी मधील जागतिक बँकेच्या सल्लागरपदी नेमणूक करण्यात आली
शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठाकडून 20 नोव्हेंबर 2021 रोजी मानद डॉक्टरेट प्रदान
1 डिसेंबर 2021 रोजी अमेरिकेन सरकारची प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर करण्यात आली
काय आहे फुलब्राईट शिष्यवृत्ती?
- अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप
- 2021 मध्ये जगभरातील 40 शिक्षकांना ही प्रतिष्ठेची स्कॉलरशिप जाहीर
- पीस इन एज्युकेशन या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली
- लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत आहेत
- याच विषयावर अधिक संशोधन करण्याची संधी डिसले गुरुजींना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळणार
- अमेरिकन सरकारकडून दिली जात असून हे 75 वे वर्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या