Petrol-Diesel Price Today 9 August in Mumbai : सरकारी तेल कंपन्यांनी आज म्हणजेच, 9 ऑगस्ट 2022 रोजी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) नवे दर जाहीर केले आहेत. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आधीच गगनाला भिडलेल्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. त्यामुळे महागाईमुळे बेजार झालेल्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

महाराष्ट्र वगळता देशातील सर्व राज्यांत तब्बल 79 दिवसांपासून इंधन दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकीकडे पेट्रोल (Petrol) -डिझेलचे दर (Diesel) स्थिर आहेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतींत मात्र सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. 

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. याव्यतिरिक्त पुण्यात पेट्रोल 105 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. राज्यात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल परभणीत विकलं जात आहे. परभणीत पेट्रोल 108.92  रुपये प्रति लिटर आणि डिझेल 95.30 रुपये प्रति लिटरनं विकलं जातंय. 

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोलच्या किमती  डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे  105 92
नागपूर  106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे  106.05 92.58 
नांदेड  108.24 94.71
रायगड  105.96 92.47
अकोला  106.05 92.55
वर्धा  106.56 93.10
नंदुरबार  106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली  105.96 92.54
जालना 107.76  94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).