एक्स्प्लोर

दहावी नापासांकडून शाळांचं मूल्यमापन, 'असर' अहवालाचं धक्कादायक वास्तव

असर अहवाल नेमका कसा तयार केला जातो. हा अहवाल तयार करत असताना ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी संरपंचांची परवानगी घेतली जाते का? किंवा शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांची परवानगी असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. सोलापूरमधील शाळेत जाऊन रणजितसिहं यांनी असर अहवालाचं वास्तव मांडण्याच प्रयत्न केला.

मुंबई : देशातील आणि राज्यातील शैक्षणिक स्थितीचा आढावा घेणाऱ्या 'असर 2018' अहवालाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. मात्र असर अहवाल कसा तकलादू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी केला आहे. असर अहवाल नेमका कसा तयार केला जातो. हा अहवाल तयार करत असताना ग्रामीण भागात सर्वेक्षणासाठी संरपंचांची परवानगी घेतली जाते का? किंवा शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांची परवानगी असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. सोलापूरमधील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी शाळेत जाऊन असर अहवालाचं वास्तव मांडण्याच प्रयत्न केला. सर्वेक्षण केवळ कागदावरच? सोलापूरच्या एका शाळेतील मुख्याध्यापकांशी रणजितसिंह यांनी चर्चा केली आणि त्यांच्या शाळेत नेमकं सर्वेक्षण कसं झालं याची माहिती घेतली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. असरचे एक प्रतिनिधी सागर सुतार या शाळेत सर्व्हेक्षणासाठी आले होते. मात्र त्यांच्याकडे गट शिक्षण अधिकारी किंवा शिक्षण अधिकारी यापैकी कोणाच्याही परवानगीचे पत्र नव्हते. सरपंचांनी आपल्याला परवानगी दिल्याचं असरच्या प्रतिनिधींनी सांगितलं. सरपंचांनी मात्र आपण अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र विद्यार्थ्यांची तपासणी होणार आहे आणि उद्देश चांगला आहे, असं समजून मुख्याध्यापकांनी असरच्या प्रतिनिधीला सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली. विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासंबधीची कोणतीही प्रश्नपत्रिका या प्रतिनिधीकडे नव्हती. उलट आम्ही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करतो आणि शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती तपाण्यासाठी शाळेत आल्याचं असरच्या प्रतिनिधीने सांगितलं.
‘असर’चा अहवाल प्रसिद्ध, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम
मुख्याध्यापकांनी अखेर पालकांना विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितलं. घरी जाऊन तपासणी करणार नाही, असं असरच्या प्रतिनिधीनं स्पष्ट केलं. त्यावेळी नेमकं सर्वेक्षण कसं होणार असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आणि केवळ कागदावर हे सर्वेक्षण केलं जातं का? असा सवाल उपस्थित झाला आहे. दहावी नापासांकडून शाळांचं सर्वेक्षण दुसऱ्या एका शाळेत असरने चक्क दहावी नापास असलेला प्रतिनिधी पाठवला होता. याबाबत सांगताना त्या शाळेतील प्राथमिक शिक्षकांनी सांगितलं की, ज्यावेळी असरचे प्रतिनिधी आमच्या शाळेत आले त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी असरबाबत माहिती शाळेला दिली आणि शाळेचं मुल्यांकन सुरु झालं. मुल्यांकन सुरु असताना या शिक्षकाने सहज असरच्या प्रतिनिधीला त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न केला. त्यावेळी त्यांनी आपण दहावी नापास असल्याचं सांगितलं. यावरुन असे प्रतिनिधी शाळांच सर्वेक्षण कसं करणार? आणि शाळांचा योग्य अहवाल समोर येणार का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget