The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर100 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा सिनेमा भाजपच्या काही राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचे खास आयोजित करण्यात येत आहेत. दरम्यान काही ठिकाणी सिनेमाला विरोध होत असताना आता उल्हासनगरात मात्र  विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सिनेमाच्या समर्थनार्थ रॅली काढली आहे.


द कश्मीर फाइल्स सिनेमात कश्मीरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत 100 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. सिनेमाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेकजण सोशल मीडियावर वाद घालत आहेत. उल्हासनगर शहरात या सिनेमाच्या समर्थनार्थ अशोक अनिल सिनेमा आणि बिग बॉस सिनेमा पर्यंत रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.


न्यूझीलंडमध्येही कश्मीर फाईल्सवरुन वाद


सध्या चर्चेत असलेल्या 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाच्या प्रदर्शनावर न्यूझीलंडमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स (Winston Peters) यांनी निषेध केला आहे. न्यूझीलंडचे माजी उपपंतप्रधान विन्स्टन पीटर्स म्हणाले, 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील नागरिकांच्या  स्वातंत्र्यावर हल्ला करणे होय. विन्स्टन पीटर्स यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांचे मत व्यक्त केले आहे. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाला सेन्सॉर करणे म्हणजे न्यूझीलंडमधील 15 मार्चच्या अत्याचाराची माहिती सेन्सॉर करणे होय.


संबंधित बातम्या


'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले


World Tv Premiere : 'पुष्पा- द राइज' आणि '83'चा आज होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर


The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha