The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाने आतापर्यंत 100 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाला भाजपचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. या सिनेमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजपच्या नेत्यांनी समर्थन केले आहे. हा सिनेमा भाजपच्या काही राज्यांत करमुक्त करण्यात आला आहे. तर कुठे सिनेमा पाहण्यासाठी कामगारांना रजा देण्यात आली आहे.
भाजप एकीकडे या सिनेमाला पाठिंबा देत असताना विरोधक म्हणत आहेत,'द कश्मीर फाइल्स' या सिनेमात संपूर्ण सत्य दाखवण्यात आलेले नाही. अनेक भाजपशासित राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. यात हरियाणा, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, त्रिपूरा, उत्तर प्रद्रेश आणि उत्तराखंडचा समावेश आहे. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा सिनेमा भाष्य करणारा आहे.
महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा पाहवा यासाठी भाजपचे नेते पुढाकार घेत आहेत. भाजप आमदार नितेश राणे कणकवलीत 'द कश्मीर फाइल्स'चे खास शो आयोजित करणार आहेत. महाराष्ट्रात हा सिनेमा करमुक्त व्हावा यासाठी नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहिले आहे. त्यावर अजीत पवार म्हणाले होते, "राज्याने हा सिनेमा करमुक्त करण्यापेक्षा केंद्रानेच करावा".
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी 'द काश्मीर फाईल्स' हा सिनेमा पाहण्यासाठी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची विशेष सुट्टी जाहीर केली आहे. तर मध्यप्रदेशातील पोलिसांना सिनेमा पाहण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे.
भाजप नेते रेणु हंसराज यांनी मुंबईत प्रेक्षकांसाठी 'द कश्मीर फाइल्स'चा खास शो आयोजित केला होता. दरम्यान 300 प्रेक्षकांना हा सिनेमा मोफत पाहता आला.
भाजप कश्मीर फाइल्स या सिनेमाबाबत हिंदुत्वाचा अजेंडा राबवत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये भाजपचे नेते शिरीष बोराळकर यांनी या सिनेमाचे दहा शो बुक केले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील सर्वसामान्य प्रेक्षकांना हा सिनेमा मोफत दाखवला जाणार आहे.
संबंधित बातम्या
The Kashmir Files चा विक्रम, आठव्या दिवशी सर्वाधिक कमाई, 'दंगल'लाही धोबीपछाड!
The Kashmir Files Box Office Collection : 'द कश्मीर फाइल्स'ने रचला इतिहास, सात दिवसांत केली 100 कोटींची कमाई
The Kashmir Files ,Varun Dhawan : 'द कश्मीर फाइल्स'चं कौतुक केल्यानंतर वरूण धवन ट्रोल; नेटकरी म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha