Sudhir Mungantiwar :  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एमआयएमची ऑफर धुडकावली. तसेच एमआयएम भाजपची बी टीम असल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी केला. या आरोपाला भाजपचे नेते सुधीर मनगुंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मग शिवसेना ही काँग्रेसची बी टीम आहे का? असा सवाल मनगुंटीवार यांनी उपस्थित केला.


शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. सत्तेसाठी बेईमानी केली. टीम मजबूत करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यांनी 100 जागा लढवल्या तर 188 शिल्लक राहतात म्हणजे बाकी दोघांना 84-84 मिळतील. शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज न होण्यासाठी प्रयत्न केले जातायत, असे सुधीर मनगुंटीवार म्हणाले. अंगार-भंगार हे शब्द खेळ आहे. अंगारचे भंगार कधी झाले हे माहाराष्ट्राच्या जनतेने पाहीले आहे. बाळासाहेबांचा शब्द शब्द होता. आम्ही मेहबुबाबरोबर आमच्या कंडीशनवर गेलो, हे पवारांच्या कंडीशनवर गेले. यांनी शरद पवारांसमोर हिंदुत्व गहान ठेवल्याची घणाघाती टीका मनगुंटीवार यांनी टीका केली.


आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी नाही तर लोकांची मनं जिंकण्यासाठी काम करतो. असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांना कॅंग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडवी लागले. कारण जनतेने त्यांना नाकारले आहे. तुम्ही त्यांच्या नादी लागत आहात, असे मुनगंटीवार म्हणाले. ज्या बँकेनं, स्फोटाने अनेक लोक मारले गेले. मुंबईत बायका विधवा झाल्या, लहान मुलं अनाथ झाली. अश्या माणसाच्या मांडीला मांडी लावून तूम्ही बसता, हे खूप आश्चर्यकारक आहे.   ज्याने टेरर फंडींग केले. बाळासाहेब म्हणाले होते की छगन भुजबळला मंत्री होऊ देणार नाही. तो तुमच्या बाजूला बसला आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.


इम्तियाज जलील काय म्हणाले होते?
ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे.  महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे.  भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं.  शिवसेनेसोबतही आघाडीची एमआयएमची तयारी असल्याचं बोललं जातंय.