Rajya Rsabha Election 2022 : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यसभेसाठी शिवसेना (Shiv Sena) उमेदवाराला मतदान न केलेल्या आमदारांची नावे सांगितली आहेत. या यादीत अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांचा देखील समावेश आहे. शिवसेना उमेदवाराला ज्या आमदारांनी मतदान केलं नाही त्यांची नावे सांगताना संजय राऊत यांनी स्वाभिमानीचे देवेंद्र भुयार असा उल्लेख केला होता. परंतु, यावरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी फेसबूक पोस्ट लिहून भुयार यांचा स्वाभिमानीचा आमदार म्हणून उल्लेख करून नका असे म्हटले आहे. याबरोबरच भुयार असे का वागले या प्रश्नाचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील देतील असे म्हटले आहे.


"आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. तर घोडेबाजारात उभे होते त्यांची सहा- सात मतं आम्हाला मिळाली नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांनी या आमदारांमध्ये देवेंद्र भुयार यांचे देखील नाव घेतले आहे. भुयार यांचे नाव घेताना स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार असा उल्लेख संजर राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेनंतर राजू शेट्टी यांनी फेसबूक पोस्ट लिहून देवेंद्र भुयार हे स्वाभिमानीचे आमदार नाहीत, स्वाभिमानीने त्यांची हाकालपट्टी केली आहे असे म्हटले आहे.  


काय म्हणाले राजू शेट्टी?
"संजय राऊतजी ज्या आमदाराचा उल्लेख तुम्ही स्वाभिमानीचा म्हणून  केलेला आहात त्याच्या बुडावर लाथ घालून पुर्वीच आम्ही हाकालपट्टी केलेली आहे. तेंव्हा कृपा करून स्वाभिमानीचा आमदार असा उल्लेख करू नका. तो असं का वागला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवार आणि जयंत पाटील देतील."



संजय राऊत काय म्हणाले होते? 
महाविकास घाडीचे राज्यसभेचे सहावे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला.  या पराभवानंतर , "आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजारात उभे होते त्यांची सहा- सात मतं आम्हाला मिळाली नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. "आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली. हा देखील आमचा एक विजय आहे. ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेना उमेदवाराला मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.  


महत्वाच्या बातम्या


देवेंद्र भुयार म्हणाले, 'संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का? माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी पण...'